मोबाईल चोरी करण्याऱ्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखेला यश !

कोलाड येथे मोबाईल चोरी करण्याऱ्या आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश !
कोलाड-कल्पेश पवार
              कोलाड नाका येथे न्यू टाइम सेन्टर मोबाईल शॉपी या दुकानातुन तसेच स्मार्ट फोटो स्टुडिओ व मोबाईल शॉप या दुकानातून मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली होती.सदर चोरी करण्याऱ्या आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
कोलाड पोलीस ठाणे गु.र.नं. 60/2023 भा.द.वि.कलम 380, 454, 457 व 76/2023 भा.द.वि.कलम  379 अन्वये गुन्हे दाखल असून कोलाड नाका येथे न्यू टाइम सेन्टर मोबाईल शॉपी या दुकानातुन तसेच स्मार्ट फोटो स्टुडिओ आणि मोबाईल शॉप या दुकानातून मोबाईल चोरी बाबत सदर गुन्हे अज्ञात आरोपी विरोधात दाखल आहेत.
सदर दोन्ही गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. सदर गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून डेव्हिड कलेश्वर मिंज, 26 वर्षे, रा.पुई गाव, कोलाड, जि.रायगड यास सदर गुन्ह्याकामी ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने नमूद दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपीताकडून वरील दोन्ही गुन्ह्यात चोरी गेलेले विविध कंपनीचे एकूण 29 मोबाईल, 2 लॅपटॉप व एक स्पीकर तसेच सदर गुन्हे करताना वापरलेली मोटारसायकल असा एकूण 3,19,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीस पुढील कारवाई करणे करता कोलाड पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड, मा.श्री.अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड, स्थानिक गुन्हे शाखेचे, पोनि/श्री.बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक/श्री.धनाजी साठे, पोहवा/जितेंद्र चव्हाण, पोना/विशाल आवळे, पोशि/अक्षय सावंत, मपोशि/जयश्री पळसकर, सायबर शाखेचे पोना/तुषार घरत, पोशि/अक्षय पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
जन संपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड अलिबाग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *