सकल हिंदू समाजाच्या वतीने कोलाड येथे
शिवशौर्य यात्रा चे स्वागत
कोलाड-कल्पेश पवार
गोवा पणजी येथून निघालेल्या
शिवशौर्य यात्रा चे कोलाड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने पारंपरिक पोशाख परिधान करून स्वागत करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोकण प्रांत
शिवराज्याभिषेक ३५० वर्ष आणि विश्व हिंदू परिषद षष्ठीपुर्ती वर्ष निमित्त शिवशौर्य यात्रा गोवा पणजी येथून
निघाली असून या यात्रेची सांगता कल्याण येथे होणार आहे. तरी ही शिवशौर्य यात्रा कोलाड येथे बुधवार दि.०४ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजता अली असता कोलाड सकल हिंदू समाजाच्या वतीने पारंपरिक पोशाख परिधान करून टाळ,मुदुग,घेहून हरिनामाचा जागर करीत या यात्रेचे स्वागत करण्यात आले आहे.यावेळी कोलाड परिसरातीळ बहुसंख्य हिंदू बांधव उपस्थित होते.