
वरसगाव येथे कै.गुरुवर्य पटटे तुकाराम वस्ताद यांची पुण्यतिथि
खा.सुनील तटकरे,मंत्री अदिती तटकरे,आ अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत
रंगणार शक्ति-तुरा नाचाचा जंगी सामना !
कोलाड़ – (कल्पेश पवार )
कोलाड़ वरसगांव येथील कै.गुरुवर्य पटटे तुकाराम वस्ताद यांच्या ३२ व्या पुण्यतिथि निमिताने सोमवार दी.०२/१०/२०२३रोजी विविध धार्मिक आध्यत्मिक,तसेच शक्ति-तुरेवाले नाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमास बहुसंख्यक नागरिकानी उपस्थिति रहावे अशी विनंती युवा कार्यकरते तथा ग्राम.प सदस्य अजित आंब्रुसकर यांनी केली आहे.
कै.गुरुवर्य पटटे तुकाराम वस्ताद यांच्या पुण्यतिथि निमिताने खा.सुनील तटकरे मंत्री कु.अदिती ताई तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांची उपस्थिति लाभनार असुन यावेळी सकाळी 9 वाजता सत्यनारायण पूजा,11वाजता कै.गुरुवर्य पटटे तुकाराम वस्ताद चरित्र वर्णन पुरोहित -महेश जंगम यांच्या हस्ते,दू.12 वाजता
शक्ति-वाले शाहिर बिनेश दिलिप वाजे मु.गोविंल. ता.लाजा रत्नागिरी.व तुरे-वाले ओमकार आगरकर गांव -खार गावं कोळी वाडा,म्हसळा रायगड यांचा वरसगांव येथे शक्ति -तुरा नाचाचा जंगी सामना रंगणार असून सर्व शिष्य गण,ग्रामस्त,हितचीतक,रसिक जण यांनी उपस्तिथि राहवे अशी विनंती अजित आंब्रुसकर यांनी केली आहे.