रोहे”रायगड खानावळ ” कोळी स्पेशल व्हेज अँड नॉन व्हेज हॉटेल शानदार उद्धाटन सोहोळा संपन्न
खारी/रोहा (केशव म्हस्के) २९ सप्टेंबर:- रोहे – अष्टमी नगर पालिका अष्टमी कडील मिनिडोअर स्टँड,रत्न ज्वेलर्स समोर अनंत चतुर्दशी गुरुवार दि. २९ सप्टेंबर रोजी चे औचित्य साधत मौजे खारगाव चे सतीश पाटील आणि सोनगाव येथील सौरभ उत्तम गोळे यांच्या “रायगड खानावळ ” कोळी स्पेशल व्हेज अँड नॉन व्हेज हॉटेल चे माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हाटकर,शेलार मामा,उत्तम गोळे, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष मोहन धसाडेसचिव केशव म्हस्के आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले…
“रायगड खानावळ ” कोळी स्पेशल व्हेज अँड नॉन व्हेज हॉटेल मध्ये घरगुती पद्धतीचे जेवण तसेच टिफीन सर्व्हिस,चहा नाष्टा ची उत्तम सोय व तत्पर सेवा उपलब्ध करण्यात आले आहे..
मौजे खारगाव येथील सतीश पाटील आणि सोनगाव येथील सौरभ उत्तम गोळे या दोन नव तरुणांनी एकत्र येत स्वयं स्फूर्तिने नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी स्वतः व्यवसायाकडे झेप घेत आपली आर्थिक प्रगती – उन्नती साधावी या उद्देशाने स्वतःच्या हॉटेल व्यवसाय चे मोठ्या धुमधडाक्यात माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हाटकर,शेलार मामा,उत्तम गोळे, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष मोहन धसाडे,सचिव केशव म्हस्के, खारगाव ग्रा.पं.सदस्य नरेंद्र पाटील,उमेश सावंत,तरुण व्यावसायिक योगीराज म्हस्के शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रतिष्ठित मान्यवरांचे शुभ आर्शिवाद घेत मोठ्या उत्साही व आनंददायी वातावरणामध्ये “रायगड खानावळ ” कोळी स्पेशल व्हेज अँड नॉन व्हेज हॉटेल चे उद्घाटन शुभारंभ करण्यात आले..
याप्रसंगी मालक सतिश पाटील, सौरभ उत्तम गोळे यांना माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हाटकर,शेलार मामा,उत्तम गोळे, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष मोहन धसाडे,सचिव केशव म्हस्के, खारगाव ग्रा.पं.सदस्य नरेंद्र पाटील,उमेश सावंत,तरुण व्यावसायिक योगीराज म्हस्के आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींनी सदिच्छा भेट देत अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/ रोहा)