कै,पा.रा.सकपाळ सभागृह येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी
कोलाड-१८ सप्टेंबर कल्पेश पवार
रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ समाज मंदिर सामाजिक संस्था पाले बुद्रुक कोलाड येथील
कै,पा.रा.सकपाळ सभागृह येथे कोलाड विभाग नाभिक समाज तर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने ह भ प दहिबेकर महाराज संभे यांचे प्रवचन झाले यावेळी कोलाड विभाग अध्यक्ष विनायक दिवेकर, उपाध्यक्ष विजय रावकर,दुकान कमिटी अध्यक्ष अशोक कदम,तसेच य कु खराडे,सदानंद साळुंखे, काशिनाथ रावकर,प्रभाकर मोहिते,वसंत खराडे, विठोबा खराडे,राहूल भोसले,शांताराम खराडे, प्रसन्न सकपाळ, नथुराम दिवेकर,अमित खराडे,अशोक पवार, प्रकाश जाधव, सारीका साळुंखे, सुवर्णा कदम, सुदाम माने,विमल पवार,प्रचिती जाधव, स्वेता जाधव,व नाभिक समाज बांधव उपस्थित होते.