पावसाच्या संगतीने दिड-दिवसांच्या ६९८ बाप्पांना निरोप

पावसाच्या संगतीने दिड-दिवसांच्या ६९८ बाप्पांना निरोप
कोलाड दि.२०सप्टें.कल्पेश पवार :-
           रोहा तालुक्यात गेली तीन दिवस सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेतही तितक्याच भावपुर्ण वातावरणात दिडदिवसांच्या ६९८ बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी बाप्पांच्या आगमना पासून ते दीड दिवसांच्या विसर्जनातही मुसळधारेसह सुरू असलेल्या पावसामुळे भक्तगणांचा थोडा हिरमोड झाला होता.तरीही ढोल,ताशांच्या आणी टाळ,मृदुंगाच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत भक्तगणांनी अवडत्या बाप्पाला निरोप दिला.यावेळी शहरातील विसर्जन स्थळांवार मोठी गर्दी झाली होती.
           गणपती विसर्जनासाठी नगरपालिके तर्फे विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था आणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रोहा शहरातील दमखाडी घाट ,बंदर पकटी घाट, अष्टमी घाट व फरशी घाट अशी ४ प्रमुख वीसर्जन घाटांची स्वच्छता करण्यात आली होती. दुपारी ४ वाजल्यानंतर वाजत गाजत, काहीतर गुलाल उधळत, लेझिम, टाळ मॄदुंग, ढोल ताशाच्या गजरात श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती. एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नदी किनारी निघाले होते. तत्पुर्वी महसुल आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने दुपारी शहरातील विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे रहावेत यासाठी गस्त घालण्यात आली.
       भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे गजर करीत कुंडलिका नदी किनारी भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन केले. यावेळी कोण्ताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी रोहयाचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर  यांनी विसर्जन मार्गावर आणि नदी किनारी चोख बंदोबस्त ठेवले होते. रोहा तालुक्यात दिडदिवसांच्या एकुण ६९८ बाप्पांचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहीती रोहा पोलिस ठाण्याचे जयेंद्र पेढवी यांनी दिली.
चौकटीत :-
विसर्जनासाठी सर्वाधिक गर्दी होत असलेल्या स्मशानभूमी जवळील जुन्या पकटी पुलाकडे जाणारा रस्ता दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आला आहे, त्याठिकाणी पायऱ्यां बसविण्यात आल्याने विसर्जन वाहने, हातगाड्या आदींना नदी पर्यंत जाता येत नाही. त्यामुळे यंदाही गणेश भक्तांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले.नागरिकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *