कोलाड येथे आदिवासी दिन साजरा !
600 हुन अधिक आदिवासी बांधवांची उपस्थिती !
जीवनधारा संस्था कोलाड,आधार फाउंडेशन सुकेळी सेवा केंद्र संस्था पाटणसई,
रोहा- ( कल्पेश पवार ) जीवनधारा संस्था कोलाड,आधार फाउंडेशन सुकेळी सेवा केंद्र संस्था पाटणसई,
यांच्या संयुक्त विद्यमाने 600 हुन अधिक जागतिक आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत आदिवासी दिन उत्साहात साजरा….
9 ऑगस्ट 2023 रोजी जीवनधारा संस्था कोलाड, आधार फाउंडेशन सुकेळी आणि सेवा केंद्र संस्था पाटणसई यांच्या संयुक्त विद्यमाने पांडुरंग मंगल कार्यालय पुगांव खांब ता. रोहा येथे 600 हुन अधिक आदिवासी बांधवांच्या उपस्थिती जागतिक आदिवासी दिन उत्साहात संप्पन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोलाड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक साबळे साहेब ,भा ज पा चे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग,राष्ट्रवादी पक्षाच्या रोहा तालुका अध्यक्षा प्रितम पाटील, एनघर ग्रुप ग्राम पंचायत चे सदस्य, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था रोहा अध्यक्ष झोलगे साहेब, रोशन चाफेकर, पेण येथील आदिवासी समाज कार्यकर्ते संतोष वाघमारे हे सर्व मान्यवर तसेच जीवनधारा संस्था कोलाड,आधार फाउंडेशन सुकेळी आणि सेवा केंद्र संस्था पाटणसई या संस्थांचे संचालक आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विशेष आकर्षण म्हणजे राधाकृष्ण गार्डन ते नम्रता हॉटेल पर्यंत रॅली काढण्यात आले.
यावेळी आदिवासी दिनावर घोषणा देत जल्लोषात रॅली काढण्यात आली.यामध्ये महिला,पुरुष तसेच लहान मुलांचाही सहभाग होता.कार्यक्रमा दरम्यान पाहुण्यांचे स्वागत आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.साबळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उदाहरण देत खूप चांगले मार्गदर्शन केले.तसेच सर्व मान्यवरांनी आप -आपले विचार मांडत आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.आणि उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.तसेच इरसलवाडी येथील दुर्घटने मधील मृत पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच आलेल्या सर्व आदिवासी बांधवांसाठी नास्ता आणि जेवणाची सोय देखील करण्यात आली होती.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आणि आलेले सर्व आदिवासी बांधवांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला