प्राचार्य डॉ.विश्वास देशमुख यांना महाराष्ट्र गुणवंत शिक्षक सन्मान प्रदान

प्राचार्य डॉ.विश्वास देशमुख यांना यावर्षीचा महाराष्ट्र गुणवंत शिक्षक सन्मान प्रदान
कोलाड,( कल्पेश पवार)
         येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित डॉ. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवे कोलाडचे प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख यांना नेहरू युवा केंद्र पणजी गोवा (सरकार) व किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्र गुणवंत शिक्षक सन्मान दि. ०९ जुलै २०२३ रोजी सुभाष फळदेसाई (मजूर व पुराभिलेख मंत्री गोवा राज्य), डॉ. चंद्रकांत शेटये ( आमदार गोवा राज्य), सगुण वेळीप (संचालक, कला व संस्कृती संचानालय , गोवा) कालिदास घाटवळ (उपसंचालक, नेहरू युवा केंद्र, पणजी भारत सरकार), माझी केंद्रीय मंत्री मा. रमाकांत खलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र याचा समावेश आहे.
प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख हे गेली १६ वर्षाहून अधिक काळ अध्यापनाचे कार्य करतात, त्यांच्या अध्यापनाचा मुख्य विषय अर्थशास्त्र आहे.अर्थशास्त्र विषयात त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात् सहभाग नोंदविला आहे. तसेच १५ हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. सहा पेटंट प्रकाशित झालेले आहेत, ४ पुरस्कार ही त्यांना मिळालेले आहेत.
प्राचार्य डॉ. विश्वास देशमुख यांच्या या सन्मानाबाबत संस्थेचे ट्रस्टी मा.संदीपजी तटकरे, सर्व संस्थेचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी व पंचक्रोशीतील सर्व प्राध्यापक मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *