
कोलाड येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय कबडी स्पर्धेत तटकरे तंत्रनिकेतन संघाची बाजी !
कोलाड (कल्पेश पवार)
कोलाड गोवे येथील श्रीमती.गीता. द.तटकरे तंत्रनिकेत येथे गुरुवार दि.23जानेवारी रोजी पार पडलेल्या कबडी स्पर्धेत होम ग्राऊंड वर शासकीय तंत्रनिकेतन पेण यांच्यात रंगलेल्या अटीतटी च्या लढतीत तटकरे तंत्रनिकेतन संघानी बाजी मारली आहे.
तंत्रनिकेतन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडेंट स्पोर्ट्स असोसिएशन A1 झोन मार्फत जिल्हा स्तरीय कबडी स्पर्धा तटकरे तंत्रनिकेतन येथील भव्य दिव्य मैदानावर पार पडल्या यात जिल्हा भरातून 18 कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सहभाग घेतलेल्या सर्व संघाची तटकरे तंत्रनिकेतनमार्फत उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.यात फायनल सामना हा तटकरे तंत्रनिकेतन विरुद्ध शासकीय तंत्रनिकेतन पेण असा रंगला यात उत्कृष्ट खेळ खेळीत तटकरे तंत्रनिकेतन संघांनी बाजी मारली.
सहभाग घेतलेल्या व विजयी संघांना तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त संदीप तटकरे,यांच्या मार्गदर्शनाखाली रजिस्टार अजित तेलंगे,प्राचार्य विपुल मसाल, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी कॉलेज चे प्राचार्य देशमुख सर ,ITI चे प्राचार्य संजय हजारे सर क्रीडा विभाग प्रमुख चैत्यन भगत तसेच शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या सामन्यात पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचालन मेकॅनिकल विभाग प्रमुख रुपेश पवार,सुजित पाटिल रोशनी मॅडम यांनी केले.