
बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत
–खा.सुनील तटकरे
खांब,दि.१५(नंदकुमार मरवडे)
फुले,शाहू, आंबेडकर या थोरांची विचारधारा मनात कायम बाळगली असल्याने व
बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी सत्तेत सहभागी झालो असल्याचे खा.सुनील तटकरे यांनी सांगितले.
रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्री.रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्या.खांब व द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब या संस्थेस खा.सुनील तटकरे, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे व मा.आ.अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून नामांकित गेल कंपनीकडून ५० लाख रूपयांचे प्राप्त झालेल्या निधीतून इमारतीचे पहिल्या मजल्याचे भूमीपूजन समारंभ ता.१५ रोजी रायगडचे खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खा.सुनील तटकरे बोलत होते.
यावेळी सर्वश्री चेअरमन महेंद्र पोटफोडे, रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, बाबुराव बामणे, नारायण धनवी,राम कापसे,राम मरवडे, धोंडू कचरे,सुरेखा पारठे,तानाजी जाधव,वसंत मरवडे,नंदकुमार कापसे, गजानन भोईर, मनोज शिर्के, नरेंद्र जाधव,भाई पोटफोडे,भाऊ पोटफोडे, धनाजी लोखंडे, सुभाष माटल,रविंद्र मरवडे,दत्ता वातेरे,मानसी चितळकर,कांचन मोहिते,निलम मरवडे,गेल कं.कार्यकारी अधिकारी अनुज गुप्ता आदी संचालक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख मान्यवर म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा.सुनील तटकरे यांनी पुढे पोटफोडे मास्तर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संस्था उभी केली व आज या संस्थेची शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होऊन वटवृक्षात रूपांतर होताना दिसत आहे.या मातीचे वैशिष्ट्ये म्हणजे विश्वास आणि याच विश्वासातून या भागाने आमच्या परिवाराला चार दशके प्रेम दिले असल्याने या विभागाच्या व शैक्षणिक संस्थेच्या विकासकामात कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन देतानाच या संस्थेतून भविष्यकाळात
या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे व संस्थेतून
नवतंत्रज्ञ व शिक्षणतज्ञ निर्माण व्हावे हेच आपले स्वप्नं असल्याचे शेवटी त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रकाश थिटे यांनी केले.सुत्रसंचलन महेंद्र तुपकर यांनी तर मुख्याध्यापक सुरेश जंगम यांनी आभार व्यक्त केले.