खांब ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन

खांब ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन
खांब,दि.२६(नंदकुमार मरवडे)
सालाबादप्रमाणे या ही वर्षी बुध.दि.३० आॅक्टो..ते सोम.दि.११ नोव्हें.या कालावधीत
रोहा तालुक्यातील खांब ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वा.सु.नि.अलिबाकर बाबा,गोपाळ बाबा वाजे,धोंडू बाबा कोलाटकर यांच्या कृपाशीर्वादाने व संस्थापक-अध्यक्ष कृष्णा महाराज जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपन्न होणाऱ्या या दिंडी सोहळ्यास दि.३० आॅक्टो.रोजी स.७ वा.खांब येथील विठ्ठल मंदिरातून प्रारंभ होणार असून या दिंडी सोहळ्याचे यशस्वीतेसाठी मार्गदर्शक मारूती महाराज कोलाटकर,अध्यक्ष सदानंद जाधव, उपाध्यक्ष कृष्णाराम धनवी,सचिव अजय पारठे, खजिनदार प्रकाश थिटे, सदस्य ज्ञानेश्वर लोखंडे, गणेश जाधव, एकनाथ मरवडे, शुभांगी महाडिक,राधिका लोखंडे आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह दिंडी व्यवस्थापक मंडळाचे रामचंद्र जाधव, शांताराम महाडिक, देविदास भोईर,भरत कान्हेकर, लक्ष्मण भोसले, नथुराम जाधव,राम लोखंडे, काशिनाथ कान्हेकर मोलाचे सहकार्य करीत आहेत.ज्या भाविकांना या दिंडीत सोहळ्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपला आधारकार्ड सोबत आणावा.तर अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी कृष्णाराम धनवी ८२३७९०१०९४, सदानंद जाधव ९८२३८१५०२६, ज्ञानेश्वर लोखंडे ७४९९५२४३५४ व अजय पारठे ८७९३८३९६८६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *