तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी पांडुरंग नागावकर यांची निवड
खांब,दि.३१(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रा.पंचायतीचे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपदी तळवली येथील रहिवासी असणारे पा़ंडुरंग भिकू नागावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सरपंच रविंद्र मरवडे यांच्या अध्यक्षतेखाली ता.३० आॅगस्ट रोजी संपन्न झालेल्या सभेप्रसंगी त्यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी उपसरपंच संदीप महाडिक,पो.पाटील गणेश महाडिक,मा.सपंच वसंत मरवडे, सदस्य दयाराम मरवडे,निलम वाळंज, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ कोस्तेकर, मधुकर पवार, सुरेश वाघमारे, आविष्कार मरवडे,मोनिका महाडिक, ग्रा.सेविका पिंपळकर,सुभाष बामणे आदी मान्यवर उपस्थित होते.गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या पांडुरंग नागावकर यांच्या या निवडीचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले असून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.