आकार प्रतिष्ठान पोलादपूर चा स्तुत्य उपक्रम
तालुक्यातील हुशार व गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणार…….
–अजय सलागरे
रोहा,दि.,१६(प्रतिनिधी)
आकार प्रतिष्ठान पोलादपूर या सामाजिक संस्थेची त्रैमासिक सभा नुकतीच प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. अजय सलागरे यांचे अध्यक्षतेखाली कापडे बु येथे संपन्न झाली. प्रतिष्ठान मार्फत पुढील काही दिवसात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय करियर मार्गदर्शन वर्ग आयोजित केला जाणार आहे. डिसेम्बर 2024 मध्ये तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 11 मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच आकार प्रतिष्ठान मार्फत तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येणार असून त्याकरिता काही विद्यार्थ्यांची निवड संस्थे मार्फत करण्यात आली असून आर्थिक मदत करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक मेळावा , माजी सैनिक सन्मान मेळावा असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. या सभेस उपाध्यक्ष श्री रामदास सकपाळ, सचिव श्री राजाराम शेलार सर, खजिनदार श्री रविकांत सकपाळ सर , जेष्ठ विश्वस्त श्री अजितकुमार जंगम सर , श्री ज्ञानेश्वर सकपाळ व श्री अमर सलागरे हे उपस्थित होते.