रोह्यात महायुतीचे उमेदवार रवीशेठ पाटील यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली
तालुक्यातून रवी शेठ पाटील यांना भरघोस मतांची लीड देणार : अमित घाग
धाटाव: (जितेंद्र जाधव)
संपूर्ण १९१ पेण विधानसभा क्षेत्रात लोकप्रिय उमेदवार रवीशेठ पाटील यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसून असुन प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रत्येक कार्यकर्त हे घरोघरात जात आहेत . थेट संपर्क साधावा जात आहे.
आमदार रवी शेठ पाटील हे पेण मतदारसंघात गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर रोहा तालुक्यातील अनेक गावाचा विकास केलेला आहे. कधीही कामाचा गवगवा केलेला नाही . त्यामुळे त्या पुन्हा विधानसभेत पाठवण्यासाठी महयुतीचा प्रत्येक कार्यकर्ता कमळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन कार्यकर्ते मतदारांना करत आहेत.
कोलाड, सुतारवाडी , खांब ,देवकान्हे , मालसई, पिगळसई, मेढा, आंबेवाडी, धामणासई, रोठ बुद्रुक , रोठ बुद्रुक या सर्व भागात रवी शेठ पाटील यांना निवडून आणण्यासाठी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता जोमाने कामाला लागला आहे. रात्रंदिवस तहानभूक हरपून विभागातील गावागावात ,वाड्या वस्तीत गाव बैठका घेऊन आमदार रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून केलेला विकास कामाचा लेखाजोखा मांडत आहेत. विशेषता या विभागात खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे , आमदार अनिकेत तटकरे, खासदार धैर्यशील पाटील व शिंदे शिवसेनेच्या केलेल्या विकास कामाचा देखील फायदा मतांच्या स्वरूपात नक्कीच रवी शेठ पाटील यांना होणार आहे . गेल्या 40 वर्षाच्या कालखंडात रवी शेठ पाटील यांनी जनतेशी ऋणानुबंध ठेवले आहेत. त्यामुळे येथील जनतेशी नाळ जुळलेली असल्याने मतदार राजा कमल या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी रवीशेठ पाटील यांना निवडून देतील असा विश्वास रोहा भाजपा तालुकाध्यक्ष अमित घाग व्यक्त केला आहे.