श्रमिक विद्यालयास लॅपटॉप प्रोजेक्टरची भेट व शैक्षणिक साहित्याचे वाटप

श्रमिक विद्यालयास लॅपटॉप प्रोजेक्टरची भेट व शैक्षणिक साहित्याचे वाटप
खांब,दि.२५(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे
लॅपटॉप प्रोजेक्टरची भेट व शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच खाऊ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
गेल्या दहा वर्षांची यशस्वी परंपरा राखत याही वर्षी साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने
स्व. सामाजिक कार्यकर्ते शिवरामकृष्णन आयर यांच्या स्मरणार्थ व डॉ.असिफ कासकर यांच्या विशेष प्रयत्नांतून विद्यालयास लॅपटॉप प्रोजेक्टरची भेट देऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.असिफ कासकर, डॉ ‌गौतम त्रेहन,अमित चौधरी,संदीप विचारे, प्रो.कविता पाटील, अश्विनी विचारे, संदेश गमरे,विनोद पाटील,तौसिफ येरूणकर,मुख्याध्यापक
दिपक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
गत वर्षी डाॅ.असिफ कासकर यांनी विद्यालयास लॅपटॉप प्रोजेक्टरची भेट देण्याचे अभिवचन दिले होते.त्यांनी आपली वचनपूर्ती करून विद्यालयास लॅपटॉप प्रोजेक्टरची भेट दिली आहे.डाॅ.असिफ कासकर यांच्या या सहकार्याबद्दल नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संस्था व श्रमिक विद्यालय चिल्हे यांच्या वतीने जाहिररित्या आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *