कोलाड हेटवणे येथे शिवजयंती साजरी….
कोलाड -कल्पेश पवार
जय बजरंग क्रीडा मंडळ हेटवणे यांच्या वतीने तिथी प्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ वी जयंती हेटवणे गावामध्ये साजरी करण्यात आली.यावेळी हेटवणे गावचे माझी पोलीस पाटील मोतीराम तेलंगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण केली. यावेळी उपस्थित रोहा तालुका प्रमुख समिरशेठ शेडगे.हेटवणे गावचे युवा कार्यकर्ते दर्शन तेलंगे,युवा नेते संदिप तटकरे ,सभे सरपंच समीर महाबले
अनिल निकम,अमीर तेलंगे ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते.यावेळी शिवजयंती निमित्त महिलासाठी होमिनिस्टर व लहान मुलीसाठी संगीत खुर्ची चे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.
हे कार्यक्रम चांगल्या रीतीने पारपडण्या जय बजरंग क्रीडा मंडळाच्या सर्व सभासदनी खुप मेहनत घेतली….