चिंचवली तर्फे आतोणे ग्रामपंचायत हद्दीत आरोग्य व शासकीय योजनेच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
परिसरातील ५०० जणांनी घेतला लाभ
कोलाड-कल्पेश पवार
भाजप रोहा तालुका उप अध्यक्ष रवींद्र तारू
यांच्या नेतृत्वाखाली रोहे तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोणे ग्रामपंचायत हद्दीत उन्नती हॉस्पिटल व आय सी यु पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दि.९ मार्च रोजी जय फार्म राजीव अमृते हंडेवाडी येथे शासकीय योजना व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरातील ५०० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.
सदर शिबिर प्रसंगीं पांडुरंग वराल,समाधान पाटील,श्रीकांत किल्लेकर,प्रतीक पानकर,प्रियंका पाटिल,वर्षदा पाटिल राजू अमृते, माजी सरपंच छाया तारू,हाजी कोठारी,विठ्ठल पवार,दिनकर सानप, विनायक दिवेकर,सुनील म्हस्के,नारायण भोईटे नारायण शिंदे,भास्कर चोरगे,सचिन मुसळे गजानन जाधव,प्रतीक पानकर आदित्य घायले,श्रीकांत किल्लेकर,आदि मान्यवर उपस्थित होते.
उन्नती हॉस्पिटल आय सी यु पनवेल यांच्या सहकार्याने भाजपचे रोहा तालुका उप अध्यक्ष रवींद्र तारू यांच्या माध्यमातून मोफ़त आरोग्य तपासणी शिबिर व शासकीय योजनेच्या शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिरात मुतखडा, दुर्बिणीच्या माध्यमातून उपचार मूत्रपिंड, मूत्रमार्ग उपचार पौरुष ग्रथी, डायलिसिस, तसेच पॅन कार्ड, इश्रम कार्ड,प्रधानमंत्री किसान योजना,अभा कार्ड,प्रधान मंत्री सुरक्षा योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अशा शिबीर ग्रामीण भागात पहिल्यांच तारू शेट यांच्या माध्यमातून लागल्याने सदर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला परिसरातील ५०० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोष शिर्के,संतोष मोरे,संजय मुसळे,राहुल पडवळ,दयाराम महाडिक सीताराम जाधव गण्या पवार अनिल शेडगे, यशवंत शेडगे,अशोक महाडिक,सुनील घोसाळकर, मंगेश आमुस्कर सुरेश महाडिक,रोशन बरस्कर विठ्ठल शिर्के संजय महाडिक, मेहनत घेतली.