आमचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटविणारे आहे,घर पेटविणारे नाही! – उद्धव ठाकरे
रोह्याच्या उरूस मैदानावर हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधवांची उपस्थिती.
रोहा,/कोलाड दि. ०१ फेब्रु.कल्पेश पवार ;- रायगड म्हटला तर गद्दारांना टकमक टोक दाखवायला लागेल. कितना भी खावो और भाजप मे आवो सब कुछ भूल जाओ अशी भुमिका भाजपाने घेतली आहे. एकीकडे भ्रष्टाचार करा आणि पाप धुवायला आमच्याकडे या नाही तर ईडी लावून तुम्हाला घेऊ त्या भीतीपोटी गद्दार पळून भाजप मध्ये जात आहेत. आमचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटविणारे आहे, घर पेटविणारे नाही. भारत सरकारच्या योजना हा शब्दही भारतातून काढून टाकले आहे. या देशातील मोदी नावाची हुकूमशाही देशातून काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. रोहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंवाद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. ठाकरे यांना ऐकण्यासाठी रोह्याच्या उरूस मैदानावर हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधवांनी सभेला उपस्थिती लावली होती.
रोह्याच्या उरूस मैदानात कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेची सभा हा समन्वय पाहता याच मैदानावर हिंदू मुस्लिम सभेला गुण्यागोविंदाणे एकत्र असलेले पहायला मिळाले. शिवसेना प्रमुखांनी पिढ्यानं पिढ्या चांगल्या विचाराने घडविल्या. माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केला. पक्ष चोरला, चिन्ह चोरला. भाजप म्हणजे चोर बाजार आहे. गद्दार होते ते भाजप बरोबर गेले. मर्द व खरे वाघ माझ्या सोबत आहेत. निर्मला सीतारामन ने आज मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला आहे कारण यापुढे त्यांना अर्थसंकल्प मांडण्याची वेळ येणार नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तिकडे मोदी केले नाहीत. मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवायला गेले नाहीत. आता त्यांना भीती वाटायला लागली असल्याचे दिसते म्हणून मोदीजी महाराष्ट्र दौरा करायला लागले आहेत.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, मराठी मुस्लिम सेवा संघ अध्यक्ष फकीर महम्मद ठाकूर, उपनेते विनोद घोसाळकर, आ. संजय पोतनीस, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, महाड नगरपरिषद माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जिल्हा प्रमुख अनील नवगने, तालुका प्रमुख समीर शेडगे, शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, उपतालुका प्रमुख विष्णू लोखंडे, युवा तालुकाप्रमुख राजेश काफरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, कोकणात निसर्ग चक्रीवादळ 3 जून 2020 रोजी आले त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. कोकणातील उध्वस्त झालेल्या नागरिकांना सर्वात जास्तीची मदत केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन दिली. त्यानंतर तोक्ते चक्रीवादळ आले. आगोदर कोरोना सारख्या महामारीला सामोरे जावे लागले त्यावेळीही ठिकठिकाणी शिवभोजन थाळी व लसीकरण वेगाने करण्याचा विक्रम मी मुख्यमंत्री असताना केला. दहा वर्षे लागली यांना राम मंदिर बांधायला. आम्ही राममंदिर बांधण्यासाठी विरोध नाही केला. उलट ते लवकर होण्यासाठी प्रयत्न केले. मी दोन वेळा युतीच्या सरकारमध्ये पाठिंबा भाजपाला दिला मात्र यांनी माझा पक्षच चोरला. दोन्ही वेळा बहुमताने निवडून आलो तरी शिवसेनेला खातेवाटप करताना भाजपाने दुजाभाव दाखविला. विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्रात आणि मोठं मोठे चांगले उद्योग गुजरातला नेले. त्यामुळे कोकण वासियांना नोकरी धंद्यापासून वंचित ठेवले गेल्याने तरुणांवर बेकारी ओढवली आहे. भारतीय जनता पार्टीने भगव्याला छेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे भेकड आहेत. राजकीय आखाड्यात त्यांना गाढल्याशिवाय आता गप्प बसणार नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया :-
रोह्याच्या इतिहासात न भूतो न भविष्यतो अशी विराट सभा उरूस मैदानावर होत आहे. आता रोहा कुणा एका पक्षाची मक्तेदारी राहिली नाही, रोह्याचा सातबारा कुणाच्या नावावर असेल तर सातबारा खालसा केला आहे.
– अनंत गीते, माजी केंद्रीय मंत्री