महाड येथे पत्रकार दिनानिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन

महाड येथे पत्रकार दिनानिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन
प्रतिनिधी-कल्पेश पवार
सर्व जनतेस आवाहन
एक दिवस पत्रकारांसाठी !
पत्रकार दिनाच्या औचित्य साधून रायगड प्रेस क्लब संलग्न महाड प्रेस असोसिएशन आयोजित पत्रकार चषक 2024 टेनिस बॉल मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन महाड येथील चांदे क्रीडांगणावर शनिवार  दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी आयोजन केले आहे.
      या स्पर्धेमध्ये रायगड प्रेस क्लबशी संलग्न असलेले जिल्ह्यातील सर्व तालुका प्रेस क्लबचे क्रिकेट संघ सहभागी होणार आहे त्यामध्ये कर्जत प्रेस क्लब, खालापूर प्रेस क्लब,पेण प्रेस क्लब,रोहा प्रेस क्लब,गोरेगाव प्रेस क्लब,पोलादपूर प्रेस क्लब,अलिबाग प्रेस क्लब १,आणि अलिबाग प्रेस क्लब २,महाड प्रेस असोसिएशन,नागोठणे आणि पाली (संयुक्तपणे) प्रेस क्लब,श्रीवर्धन आणि म्हसळा (संयुक्तपणे) क्लब हे संघ सहभागी झाले आहेत.
      या स्पर्धेला  खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले,आमदार प्रवीण भाऊ दरेकर, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप ,शिवसेना नेते हनुमंत जगताप ,शिवसेना युवा नेते विकास गोगावले, मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोकण विभागीय सचिव अनिल भोळे, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे ,उपधीक्षक अतुल झेंडे , महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह विविध सामाजिक राजकीय नेते उपस्थिती लावणार आहेत
         या भव्यदिव्य सामन्यांचे नियोजन महाड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाड प्रेस असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य अहोरात्र मेहनत घेत आहेत या स्पर्धा आपल्या रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या पत्रकारांच्या स्पर्धा असून या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व पत्रकार खेळाडूनां प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हातील तसेच महाडकर जनतेने मोठ्या संख्येने दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी महाडच्या चांदे क्रीडांगणावर उपस्थित राहावे ही विनंती.
         मनोज खांबे
         जिल्हाध्यक्ष
              रायगड प्रेस क्लब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *