बळीराजा फाउंडेशनच्या कृषी दिनदर्शिकेचे आज प्रकाशन, बळीराजाचे राज्य येवो
रोहा (प्रतिनिधी) सलाम रायगड संपादन प्रकाशित बळीराजा फाउंडेशनच्या प्रथमच कृषी दिनदर्शिका २०२४चे शानदार प्रकाशन आज मंगळवारी महादेव मंदिर तळाघर येथे सायंकाळी ४ वाजता होत आहे. कालव्याच्या पाण्यासाठी अविरत लढा देत विभागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चळवळ उभी करण्याचा संकल्प असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षेतील बळीराजा फाउंडेशनचे कृषी विषयक माहिती देणारा हा रंगीत कॅलेंडर आहे.
प्रकाशित दिनदर्शिका अंतर्गत कृषी विभागाच्या योजनेची माहिती, प्रत्येक पानावर कालव्याचे आंदोलन, उपोषणाचे छायाचित्र, वृत्त यांसह ऐतिहासिक सनावली, महापुरुषांचे फोटो माहिती व अन्य समर्पक माहिती देण्यात आलीआहे. हे वाचनीय तितकेच आकर्षक कॅलेंडर बळीराजाला भेट देण्यात येणार आहे. दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवड यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी शुभदा पाटील, रायगड पाटबंधारेचे मुख्य कार्य अधिकारी मिलिंद पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, कृषी अधिकारी महादेव करे, शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, व्हीआरटीचे सुशील रेळेकर करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी अनंता मगर, मेघेश भगत यांना बळीराजा सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे अशी माहिती सचिव एड. दीपक भगत यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष तुकाराम भगत, सागर भगत, सचिव दीपक भगत, खजिनदार रुपेश साळवी व पदाधिकारी, सभासद परिश्रम घेत आहेत. दरम्यान, बळीराजा हिताय बळीराजा सुखाय हा गजर विभागात होणार आहे. या कार्यक्रमाला विभागातील शेतकरी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केले आहे.