ग्रामपंचायतीला श्री सुनील तटकरे ग्रामविकास भवन नाव देणारी गोवे ही रायगड जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत –आ अनिकेत तटकरे
कोलाड-कल्पेश पवार
खा.सुनीलजी तटकरे साहेब हे गेली ४० वर्षे राजकारणात सक्रिय असून त्यानी विविध विकास कामे मार्गी लावली आहेत.परंतु जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीने त्यांच्या कामाचा गौरव अशा पद्धतीने केला नव्हता.त्यामुळे ग्रामपंचायतीला श्री सुनील तटकरे ग्रामविकास भवन नाव देणारी गोवे ही रायगड जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.असे आमदार अनिकेत तटकरे गोवे येथे उद्घाटन प्रसंगीं म्हणाले.
विधानं परिषद आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या हस्ते गोवे येथे बुधवार दि.२५ऑक्टोबर रोजी साय ७ ;३० वाजता ग्रामपंचायतीचा सुनील तटकरे ग्राम विकास भवन नामकरण, सोहळा व गोवे व्यायाम शाळा उद्घाटन पार पडले.यावेळी ग्रूप ग्रामपंचायतीचे डॅशिंग सरपंच महेंद्र दादा पोटफोडे,उपसरपंच रंजिता जाधव,विभागिय नेते रामचंद्र चितळकर,मनोज शिर्के,नरेंद्र जाधव, राम कापसे ,तानाजी मोरे,बालकृष्ण भोसले, संदेश कापसे,अजय कापसे, रमण कापसे,लहु पिंपळकर,भाऊ कापसे, राकेश कापसे,संदीप जाधव,प्रवीण पवार,राजेंद्र जाधव,अनंता पवार,गावकी अध्यक्ष नामदेव जाधव,श्रीधर गुजर,राजेश शिर्के,सुभाष वाफिलकर, महाडिक सर, सुभाष पवार,ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पवार,सुप्रिया जाधव,नितीन जाधव,अंजली पिंपळकर,निशा जवके,भावना कापसे, ग्रामसेवक गोविंद शिद,मयुरी जाधव,तसेच गोवे, मुठवली, शिरवली ग्रामस्थ,युवक,महिला उपस्थित होत्या.यावेळी आपले विचार व्यक्त करताना आ.अनिकेत तटकरे म्हणाले की,
सरपंच महेंद्र पोटफोडे यांच्या माध्यमातून गोवे,मुठवली,शिरवली गावं एकत्र आल्याने आज ग्रामपंचायती चा विकास होत आहे.अशेच एकत्र रहा आपण पोपटराव पवार यांच्या सारखीच गोवे ही आदर्श ग्रामपंचायत करू.गोवे ही एकमेव ग्रामपंचायत आहे जिथे शिवकालीन मलखाब ,लाटी कांटी,अशा प्रथा जोपासल्या जातात,तर युवकांना कित्येक दिवस भेडसावणारा व्यायाम शाळा विषय,व गावाचा विकास खा सुनील तटकरे,मंत्री अदिती तटकरे,व माझ्या निधीतून मार्गी लागत आहे.खा सुनील तटकरे कन्यादान योजना,या सारखे योजनेचा तीन्ही ग्रामस्थांना फायदा होत असून,आता पर्यत 35 मुलींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.तर माझ्या आमदार निधीतून 15 लाख निधि उपलब्ध करून देतो यात आपण नदीवरील गणेश विसर्जन घाट,रस्ता तसेच इतर कामे ग्रामपंचायतीने करावी असे सांगितले
या कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया जाधव यांनी केली, व यावेळी त्यांनी गावाच्या वतीने नवीत गावठाण येथील अंतर्गत रस्ते, व मशान भूमी रस्ता ची मागणी केली.तसेच निलेश जाधव या युवकांनानी युवकांना क्रीडांगण ची मागणी केली.
सदस्य सुप्रिया जाधव यांनी गावाच्या वतीने मागनी केलेल्या मशान भूमी कडे जाणारा रस्ता, व नवीन गावठाण,कामत येथे नवीन घरे झाल्याने अंतर्गत रस्ते,याचा साठी निधि उपलब्ध करू अशे आश्वासन आ. अनिकेत तटकरे यांनी दिले तसेंच युवकांनी मागणी केलेल्या क्रीडांगण साठी जागा उपलब्ध बाबध तुम्ही प्रस्ताव द्या आपण क्रीडा विभागाला पाठवू असे सांगितले.या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार नरेंद्र पवार यांनी मानले,यावेळी गोवे, मुठवली, शिरवली ग्रामस्थ,युवक, महिला उपस्थित होत्या.