कोलाड येथे डिझेल चोरी करताना ३ सराईत आरोपी अटकेत

कोलाड वरसगाव येथे डिझेल चोरी करताना ३ सराईत आरोपी अटकेत ,स्कॉर्पीओ गाडी ही जप्त
कोलाड-कल्पेश पवार
                  रोहे तालुक्यातील कोलाड वरसगावं हद्दीत शुक्रवारी दि.०६.१०.२०२३ रोजी पहाटे च्या सुमारास
पेट्रोल पंप नजीक रोडच्या कडेला पार्कींग केलेले ट्रकचे टाकी मधुन डिझेल चोरी करताना ३ आरोपी पोलिस  रात्रीची गस्त करीत असताना मिळून आले आहेत. तरी यांना कोलाड पोलिसांनी अटक केली असून,त्यांच्या कडील स्कॉर्पीओ गाडी ही जप्त करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,शुक्रवार दि. ०६. १०.२०२३ रोजी पहाटे ०४:३० ते ०५:०० वाजण्याचे दरम्यान कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील वरसगाव येथील पेट्रोल पंपान जीक रोड कडेला पार्कींग केलेले ट्रकचे डिझेल टाकी मधुन काहि इसम डिझेल चोरी करत असताना व चोरी केलेले डिझेल हे कॅनमध्ये भरून सदरचे कॅन हे स्कॉर्पीओ गाडीतुन घेवुन जाण्याचे बेतात असताना कोलाड पोलीस ठाणेकडील रात्र गस्तीवरील अंमलदार पोहवा / १००६ पाटील, चालक पोना / २३१३ महाडीक असे त्याठिकाणी पोहचले.
             सदरचे इसमांनी पोलीसांना पाहुन त्यापैकी २ लोकांनी बाजुचे झाडीमध्ये पळाले तरे ०१ इसम स्कॉर्पीओ गाडीसह त्याठिकाणावरून पळुन जात असताना त्यास स्कॉर्पीओ गाडीसह ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीसांनी रात्र गस्तीवरील पोना / १२९५ मोरे, पोना / १२८९ मोरे तसेच वाहतुक नियंत्रण करण्या करीता असणारे ट्रॅफीक वॉर्डन यांचे मदतीने यांना पळुन गेलेले इसमांचा आजुबाजुचे झाडी झुडपांमध्ये शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.चोरी करत असताना मिळुन आलेले स्कॉर्पीओ गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये प्रत्येकी ३५ लिटर क्षमतेचे एकुण ०८ प्लास्टीकचे कॅन त्यामध्ये एकुण २८० लिटर डिझेल मिळुन आले.आरोपीत हे सदरचे ट्रक चालक यांना दमदाटी करून मारून टाकण्याची धमकी देवून सदरचे डिझेल चोरी करून घेवुन जात असताना मिळुन आलेले आहेत.
सदर आरोपीत यांची नावे १. राजेश भगवान पवार, रा. कोपरखैरणे नवी मुंबई, २. इशाक अश्फाक खान, रा. रोडपाली, नवी मुंबई ३ साजीद इस्लाम शेख, रा. वाशी, नवी मुंबई अशी आहेत.आरोपीत यांचे विरोधात या अगोदर देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर बाबत कोलाड पोलीस ठाणे गुन्हा रजी क. ९४ / २०२३ भा.द.स. कलम ३९२, ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात एकुण ४,२१,०४० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा / १०८४ चेतन कुथे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *