वनविभागाची धडक कारवाई खैर सोलीव किटा माल वाहतुक करणारे वाहन जप्त …
रोहा कोलाड -( कल्पेश पवार )
मुंबई गोवा महामार्गावर रात्र गस्त करत असताना मौजे कुशेडे गावच्या कच्च्या रस्त्यावर मंगळवार दि.29/ 08/2023 रोजी रात्री 10.35 च्या सुमारास वन
विभागाने विना परवाना खैर सोलीव किटा माल वाहतुक करणारे मॅक्स पिकअप वाहन जप्त केली असून या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
माननीय उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा विकास भामरे,वनपाल फिरते पथक रोहा आर.जी.पाटील,वनरक्षक फिरते पथक रोहा पी. बी.करांडे, एस. डी.देवकांबळे यांनी दि. 29/08/ 2023 रोजी रात्री 10.35 वाजता मुंबई गोवा महामार्गावर रात्र गस्त करत असताना मॅक्स पिकअप क्रमांक.MH/06/G/9224 चा पाठलाग केला असता वाहन चालकाने सदरचे वाहन मौजे कुशेडे गावच्या कच्च्या रस्त्यावर थांबवून वाहन चालक फरार झाला. व सदर वाहनाची वनपाल इंदापूर प्रकाश वाघमारे,वनरक्षक माकटी अमर जाधव व वनरक्षक रातवड हरिराम बनसोडे यांचे सह तपासणी केली असता त्यामध्ये खैर सोलीव किटा माल 1.316 घ.मी. किंमत 7972/- रुपये व जप्त वाहन क्रमांक MH/06/G/9224 अंदाजे किंमत 1,50,000/- रुपये विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला.सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व खैर सोलीव कीटा माल असा एकूण एकंदर 1,57,972/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर गुन्हातील आरोपींचा तपास चालू आहे.