ठाणे जिल्हा माहिती अधिकारी पदावर मनोज शिवाजी सानप रुजू

ठाणे जिल्हा माहिती अधिकारी पदावर मनोज शिवाजी सानप रुजू ठाणे, दि.18 (जिमाका) :- ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा माहिती अधिकारी या पदावर श्री.मनोज शिवाजी सानप हे मंगळवार, दि.१८ जुलै २०२३ रोजी रुजू झाले असून प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी श्री.नंदकुमार वाघमारे यांच्याकडून त्यांनी आज पदभार स्वीकारला.
श्री.सानप हे माहिती व जनसंपर्क विभागात ते २००६ पासून आजपर्यंत कार्यरत आहेत. त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे लोकराज्य(वितरण), महान्यूज, वृत्त, आस्थापना, लेखा शाखा, अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशने या कार्यालयात अधिपरीक्षक या पदावर काम केले आहे. तद्नंतर त्यांनी जळगाव येथे माहिती अधिकारी या पदावर तर सांगली उस्मानाबाद, बीड, लातूर, रत्नागिरी व रायगड येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर शासकीय सेवा बजावली आहे. त्याचबरोबर श्री. सानप यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालय येथे सहसंचालक या पदावरही आपली शासकीय सेवा उत्कृष्टपणे बजावली आहे.
शासकीय कर्तव्याबरोबरच श्री.मनोज शिवाजी सानप यांना संचलन, अभिनय, सामाजिक कार्य, अवयवदान, ध्वजदिन जनजागृती, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मुलाखत मार्गदर्शन आदि विषयांचा व्यासंग आहे.000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *