रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या मालमत्ता विक्रीला स्थगिती मिळणार ; खा. तटकरे यांचे ठोस आश्वासननुसती स्थगिती नकोत, चौकशीअंती संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत, रोहेकरांची मागणी

रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या मालमत्ता विक्रीला स्थगिती मिळणार ; खा. तटकरे यांचे ठोस आश्वासन

नुसती स्थगिती नकोत, चौकशीअंती संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत, रोहेकरांची मागणी

कोलाड : प्रतिनिधी संपूर्ण रोह्याची अस्मिता असलेली करोडो रुपयांची सहकारी रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत व जमिन सुनिल कोठारी व हितेंद्र बाबुलाल सोलंकी बिल्डरांना अवघ्या एक कोटी दहा लाखात विकली गेली असल्याची बातमी पसरली आणि रोहा यांसह सबंध तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यातून रोहेकर व ठेवीदार खडबडून जागे झाले. व्यवहार परस्पर करत कोणा ठेवीदार, भागधारक यांना विश्वासात न घेतलेल्या प्रकियेला तातडीने स्थगिती आणत व्यवहार रद्दबातल ठरवावा यासाठी रोहेकर शुक्रवारी कमालीचे आक्रमक झाले. रोहेकरांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे समिर शेडगे, अमित घाग , नितीन परब व प्रशांत देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले होते की, तात्काळ या बँकेच्या व्यावहार निर्णय प्रक्रियेला स्थगिती मिळावी यासाठी भाजपाचे कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, खा. सुनिल तटकरे, मंत्री भरत गोगावले , मंत्री अदिती तटकरे ,आ. प्रशांत ठाकूर, आ. रविंद्र पाटील यासह रायगडमधील सर्व आमदारांनी प्रयत्न करावे अशी मागणी केली. हे वृत्त समजताच खा सुनिल तटकरे यांनी पञकारांशी संवाद साधताना सांगितले की, मी आताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना फोनवरुन रोहेकरांची संतप्त भावना लाक्षात घेऊन निर्णय प्रक्रियेला स्थगिती मिळावी अशी विनंती केली. माझ्या विनंतीला मान देऊन सहकारमंत्र्यांनी लगेचच व्यवहार स्थगितीसाठी होकार दिलेला आहे असे खा. तटकरे यांनी समस्त रोहेकरांना आश्र्वासित केले. त्यामुळे तूर्तास रोहेकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

रोहा अष्टमी अर्बन बँकेत १२०१० शेअर होल्डर आहेत. राजकीय बड्या कर्जदारांमुळे या बँकेला २००७ साली घरघर लागली. बँक बंद पडल्याने अनेक गोरगरीब लोकांचे, रोहा नगरपालिका, ईतर छोट्या पतसंस्था या़चे साडेचार कोटी रुपये बँकेकडे थकबाकी आहे. अशी या बँकेची मालमत्ता सर्वांना अंधारात ठेवून परस्पर विक्री होते. बँकेचे नातेवाईक हे बँकेचे डिफॉल्टर असताना नियमबाह्य पद्धतीने एक बिल्डरला ही मालमत्ता विकली असल्यामुळे रोहेकर चांगलेच संतापले होते. मालमत्ता विकताना बँकेचे निकष व नियम घेऊनच मालमत्ता विकली गेली. याबाबत शुक्रवारी सर्वांनीच संताप व्यक्त केला. यावर रोहेकरांच्या तीव्र भावना घेऊनच माझ्या विनंतीला मान देऊन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तात्काळ स्थगिती देणार आहेत. येत्या काही दिवसांत मंत्री अदिती तटकरे इतर सहकारी हे सहकार खात्याचे मंत्री यांना स्थगिती देण्यासंदर्भात अर्ज देतील व ते मान्य सुद्धा करतील, बँक मालमत्ता जागेत कोणत्याही प्रकारचे काम सुद्धा होणार नसल्याचे खा. तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अर्बन बँक व्यवहार प्रकरणी तूर्तास स्थगिती मिळण्याचे ठोस आश्वासन खा सुनिल तटकरे यांनी रोहेकारांना दिल्याने समितीचे समीर शेडगे, अमित घाग, नितीन परब, प्रशांत देशमुख यांनी आभार व्यक्त केले तर व्यवहार नुसता स्थगित नकोत रद्द झाला पाहिजेत, तसेच संबधित प्रशासक, बिल्डर्स संबंध व्यवहाराची चौकशी करून गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी आता जोर धरत असल्याने काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहेकरांची अस्मिता असलेली बँक म्हणजे रोहा अष्टमी अर्बन बँक या बँकेच्या मालमत्ता विक्री होणं म्हणजे रोहेकाराची दिशाभूल त्यामुळे तात्काळ आहे करांच्या भावना लक्षात घेत खासदार सुनिल तटकरे यांनी सहकार मंत्र्यांशी चर्चा करून स्थगिती मिळणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे खासदार सुनिल तटकरे यांचे रोहेकरांच्या वतीने भाजपा तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी जाहीर आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *