सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजचा मुलींच्या आरोग्या संदर्भात कार्यक्रम संपन्न
खांब,दि.६(नंदकुमार मरवडे)
मुलींच्या सदृढ आरोग्यासाठी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजने एक पाऊल पुढे टाकत मुलींच्या आरोग्या संदर्भात विशेष कार्यक्रम उत्साहात
संपन्न करण्यात आला.
कंपनीच्या सी.एस.आर विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या विशेष संकल्पनेतून,इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्युज या संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी “मासिक पाळी दरम्यान आरोग्य, स्वच्छता आणि मानसिक स्वास्थ्य” या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज च्या सी.एस.आर विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा आणि महाड तालुक्यातील एकुण ११ हायस्कूल व महाविद्यालयातील ८ वी ते १२ वीच्या एकूण ५०० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
तर कोलाड येथील द.ग.तटकरे विद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रा. तिरमाळे व इतर सहा.शिक्षक आणि कंपनीचे महेश डेरीया,आय.ए.एच.यु संस्थेच्या तज्ञ प्रतिभा कदम व वैश्णवी नवले,सी.एस.आर फाऊंडेशन चे क्षेत्र अधिकारी अमर चांदणे उपस्थित होते.सदर शिबीर यशस्वी होण्याकरिता संजय कचरे, वैशाली मुळे ,स्वाती मोहिते,दिशांत ढाणे यांचे सहकार्य लाभले.सुदर्शन सी.एस.आर विभागाच्या प्रमुख माधुरी सणस यांनी “मासिक पाळी ही स्त्री जीवनातील एक महत्त्वाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु, समाजात या प्रक्रियेबद्दल अनेकदा अव्यक्त गुप्तता आणि गैरसमज असतात. हे गुप्त ठेवण्याऐवजी याबाबत योग्य ज्ञान आणि जागरूकता असणे आवश्यक असल्याचे सांगितले.