सुदर्शन कंपनीच्या माध्यमातून स्वच्छ्ता विषयी जनजागृती रॅली
खांब,दि.५(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रा.पं.हद्दीमध्ये सुदर्शन कंपनीच्या माध्यमातून स्वच्छ्ता विषयी रॅली काढून जनजागृती कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
या कंपनीच्या सी.एस.आर विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार
कचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत “स्वच्छता ही सेवा” अभियानाचा कार्यक्रमांतर्गत सदरील कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी तळवली व चिल्हेचे जि.प.शाळेचे मुख्याध्यापक, सरपंच रवींद्र मरवडे,उपसरपंच संदीप महाडिक तसेच सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज सी.एस.आर विभागाचे स्वाती मोहिते,वैशाली मुले,अमर चांदणे ,इनोरा संस्थेचे विजय भालेराव ,श्री.कुमार आणि विनय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
यावेळी गावातील प्रमुख भागांत श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे स्थानिक नागरिकांनी व जि.प.शाळेचे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांना प्रतिज्ञा घेऊन स्वच्छता टिकवण्याचे वचन देण्यात आले आणि कचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.