स्वच्छता रॅलीच्या माध्यमातून करण्यात आली जनजागृती

स्वच्छता रॅलीच्या माध्यमातून करण्यात आली जनजागृती
कोलाड,दि.५(कल्पेश पवार)
रोहा तालुक्यातील गोवे ग्रा.पंचायत हद्दीमध्ये ता.४ रोजी स्वच्छता रॅलीच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या सी.एस.आर विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी शिरवली , मुठवली व गोवे जि.प.शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक गोविंद शिद, उपसरपंच सुमित गायकवाड ,ग्रा.पंचायत सदस्य व प्रतिष्ठित वर्ग तसेच सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज सी.एस.आर विभागाचे स्वाती मोहिते,वैशाली मुले,अमर चांदणे ,इनोरा संस्थेचे विजय भालेराव ,कुमार आणि विनय देशमुख उपस्थित होते.
तर कचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत “स्वच्छता ही सेवा” अभियानाचा कार्यक्रम स्वच्छता रॅली च्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत गोवे याठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यासाठी गावकऱ्यांची प्रत्यक्ष भागीदारी वाढविणे या उद्देशानुसार संपन्न करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, कचरा पुनर्प्रक्रिया (रीसायकलिंग) कशी करावी, तसेच कचरा व्यवस्थापनातील आधुनिक पद्धतींचा वापर कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. गावातील प्रमुख भागांत श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे स्थानिक नागरिकांनी व जि.प.शाळेचे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांना प्रतिज्ञा घेऊन स्वच्छता टिकवण्याचे वचन देण्यात आले आणि कचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *