धामणसई पंचक्रोशीत खासदार सुनिल तटकरे यांचा दौरा .

धामणसई पंचक्रोशीत खासदार सुनिल तटकरे यांचा दौरा . कार्यकर्त्यात नवचैतन्य
रोहा दि.21सप्टेंबर (शरद जाधव)
रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशीत मालसई ग्रामपंच्यायत हद्दीतील विविध विकास कामांचे भुमीपुज खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी या विभागाचा 100 टक्के विकास आपणच करु आता विकासाची चिंता करु नका आसा शब्द खासदारानी उपस्तीत कार्यकार्यकर्ते याना दिला त्यांच्या दौरा मुळे युवा कार्यकर्त्याचे मनोबळ वाढले असुन कार्यकर्त्याच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
मालसई ग्रामपंचायतीवर सरपंच मयुरी मारुती तुपकर या विराजमान झाल्यानंत खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्तीतीत विकास कामांचा धुमधडाका सुरू झाला आहे.
धामणसई पंचक्रोशी हा राष्ट्रवादिचा पूर्वीपासूनचा बालेकिल्ला आहे . दत्ताजीराव तटकरे पासुन ते सुनिल तटकरे ते आज मंत्री अदिती तटकरे ते आमदार अनिकेत तटकरे यांची युवा कार्यकर्त्यावर विशेष पकड आहे या पंचक्रोपंचक्रोशीत युवा कार्यकर्त्याचा मोठा भरणाआहे त्यांचा सततचा राबता मंत्री अदितीताई व अनिकेत भाई यांच्या पाठीशी असतो.त्यामूळे या विभागाला राष्ट्रवादीकडुन विकासाच्या बाबतीत नेहमीच झुकते माप मिळत आहे.
खासदार सुनिल तटकरे हे विविध विकास कामाच्या भुमीपूजना प्रसंगीआले असता त्यानी कार्यकर्त्याशी संवाद साधला. या विभागातील रस्त्याचा प्रस्न मार्गी लागला. येथील जनतेला मुळभूत सोई सुविधा मिळत आहेत. मी आता खासदार आहे महायूतिच्या सत्तेत आहे. त्यामूळे आपल्या सर्वाना सुगीचे दिवस आहेत.त्यामूळे विकास आपणच करु शकतो. त्यामूळे तुम्ही निचीत रहा.पक्षसंघटना जोमाने वाढवा असा सल्ला उपस्तीत कार्यकर्त्याना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *