रोह्यातील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचा गौरव!

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने रोह्यातील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक
संस्थेचा गौरव!
कोलाड-कल्पेश पवार
                  रोहे तालुक्यातील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने गौरव करण्यात आला.
                    स्वातंत्र्य दिनी  दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी. जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने.आपत्ती व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांना शासकीय स्तरावरती गौरवण्यात आले
                 याप्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास कल्याण मंत्री माननीय आदिती वरदा सुनील तटकरे, रायगड  जिल्हा अधिकारी श्री.किशन जावळे व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते संस्थेला गौरवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *