सरस्वती शिंगरे यांचे दु:खद निधन

सरस्वती शिंगरे यांचे दु:खद निधन
खांब,दि.२५(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील गोफण गावच्या रहिवाशी असणा-या सरस्वती भास्कर शिंगरे यांचे शनि.दि.२३ डिसें.रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी राहत्या घरी वृद्धपकालाने दु:खद निधन झाले.
वारकरी संप्रदायाच्या निस्सीम भक्त असणा-या सरस्वती शिंगरे या प्रेमळ वृत्तीच्या होत्या.त्यांनी आपल्या हयातीत शेती व्यवसाय सांभाळून प्रपंचाबरोबरच परमार्थही केला.त्यांनी आपली मुलं व नातवंडांवर चांगले संस्कार केले.त्यांच्या अंत्यविधीला सर्वच क्षेत्रातील समाज बांधव व भगिनी तसेच त्यांचे आप्तस्वकीय यांनी मोठी गर्दी केली होती.
त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी, सुना,जावई, नातवंडे व पतवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी सोम.दि.१ जाने.रोजी तर अंतिम धार्मिक विधी (तेरावे) गुरू.दि.४ जाने.रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *