….अखेर ३४ वर्षानंतर जुळून आले स्नेहबंध
खांब,दि.२९(नंदकुमार मरवडे)
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित
श्री.रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय,ता.रोहा या विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष सन १९८९/९० च्या इ.१० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात व आनंदाने स्नेहबंध मेळावा साजरा केला.आणि अखेर ३४ वर्षानंतर मैत्रीचे
स्नेहबंध जुळून आल्याने गेट टुगेदरची सा-यांचीच प्रतिक्षा संपली.
या विद्यालयाचे माजी विद्यार्थी व विद्यमान चेअरमन महेंद्र पोटफोडे यांच्या कुशल नियोजनातून २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून
सन १९८९/९० च्या इ.१० वी बॅचचे माजी विद्यार्थ्यी व्हाॅटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊन हा अनोखा मेळावा साजरा केला.या मेळाव्यात संचालक प्रकाश थिटे व या विद्यार्थ्यांना त्यांच्यावेळी त्यांना इ.५ वी ते इ.१० वी ला शिकविलेल्या मा.सेवानिवृत्त मुख्याध्यापक अविनाश म्हात्रे,सहा.शिक्षक के.इ.भोसले,कृष्णराम धनवी,आर.जी.म्हात्रे,अॆ.अ.ॆआंबेकर,मालती खांडेकर, सुप्रिया क्षीरसागर,स्मिता नागोठकर,नथू शिंदे, अनंता धामणसे आदी सर्व सेवानिवृत्त शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक सुरेश जंगम, दिपक जगताप, अर्चना मरवडे आदी उपस्थित होते.
यावेळी मा.विद्यार्थी राजेंद्र धनवी यांचा वाढदिवस असल्याने या सोहळ्याचे औचित्य साधून त्यांचा वाढदिवस केक कापून व त्यांना शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला.या स्नेहबंध मेळाव्यात माजी विद्यार्थी व विद्यमान चेअरमन महेंद्र पोटफोडे यांनी सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व सर्व माजी विद्यार्थ्यांचे यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आले.सुमारे ३४ वर्षांची ही भेट प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरली.जुन्या आठवणींने व मित्र मैत्रिणींच्या भेटीने सा-यांनाच मोठा आनंद झाला होता.अनेकांनी आपापले मनोगत व्यक्त करताना शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.तर सर्व शिक्षकांनी देखील दिलखुलासपणे आपले मनोगत व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.या स्नेहबंध मेळाव्याने ३४ वर्षांच्या भेटीची प्रतिक्षा संपल्याने सा-यांच्याच चेह-यावर विलक्षण समाधान दिसत होते.या स्नेहबंध मेळाव्यात माजी विद्यार्थी व विद्यमान चेअरमन महेंद्र पोटफोडे आणि नंदू मरवडे यांनी गेल्या महिनाभरापासून चांगली मेहनत घेतल्याने सा-यांनीच त्यांचे तोंडभरून कौतुक केले.शेवटी
पुन्हा लवकरच भेटू या आश्वासनाने व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाने या मेळाव्याची उत्साहात सांगता करण्यात आली.