सुमारे ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
मुंबई येथील कपाडिया परिवाराचा स्तुत्य व कौतुकास्पद उपक्रम
उपक्रमाचे सर्वत्र होत आहे स्वागत
खांब,दि.२६(नंदकुमार मरवडे)
कपाडिया परिवार मुंबई यांच्या वतीने रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथील विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटपाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
या कौतुकास्पद उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत होताना दिसत आहे.
२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले.तसेच विविध प्रकारचे खेळाचे साहित्यही भेट देण्यात आली.त्याचप्रमाणे येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनाही भेटवस्तू देण्यात आल्या.यावेळी कपाडिया परिवारातील कौशल कपाडिया, धर्मी कपाडिया,ऋषी कपाडिया,अजिति कपाडिया आणि मैत्री कपाडिया व संस्थेचे सचिव धोंडू कचरे, संचालक धनाजी लोखंडे, वसंत मरवडे, मुख्याध्यापक दिपक जगताप, नरेंद्र माळी व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी व वाडवडीलांच्या आदर्श विचारसरणीतून आमचे हे कार्य या देशातील गरजूंसाठी चालले असल्याची मनातील भावना कपाडिया परिवाराकडून यावेळी व्यक्त केली.