अलिबाग मुरुड रोहा मधील जनतेची साथ मलाच छोटम भोईर यांचा दावा

अलिबाग मतदारसंघात काटे कि टक्कर
छोटम भोईर यांचे महेंद्र दळवी यांना जशास तसे उत्तर 
अलिबाग मुरुड रोहा मधील जनतेची साथ  मलाच छोटम भोईर यांचा दावा
नाद करा पण आमचा कुठं

धाटाव:  प्रतिनिधी ( जितेंद्र जाधव)

            या रायगड जिल्ह्यात हाय व्होल्टेज मुकाबला राजकीय तालमीत नुसार अलिबाग मुरुड मतदार संघात पहायला मिळत आहे. जसजशी  मतदानाची तारीख जवळ  येत आहे तसेतसे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागलेले आहे . नुकताच शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी अपक्ष उमेदवार दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ भोईर यांच्या वर टिका केली होती की, असे शंभर छोटम खिशाल घेऊन फिरतो अशी टाका केली होती . या टिकेला तोडीसतोड उत्तर देताना रोहा तालुक्यातील  खारगाव मतदारसंघात प्रचार निमित्ताने पत्रकारांशी बोलताना छोटम भोईर यांनी सांगितले की,  मीसुद्धा  विद्यमान आमदार महेंद्र दळवी  व त्यांच्या घराण्याचा चाळीस वर्षाचा राजकीय वारसा लावलेला आहे अशा शेकापच्या  उमेदवार चित्रलेखा पाटील या दोघांचा सुद्धा माझ्यासमोर आव्हान मानत नाही कारण येथील जनताच माझ्या पाठीशी आहे . हा  मतदार संघ  महेंद्र दळवी यांना नीट ओळखता आलेला नाही  , नुसते ५००० हजार ते ७००० कोटी खर्च केले मग फक्त गेले कुठे ?  या  रोहा ते खारगाव , रोहा ते भातसई, रोहा ते सावली या भागात हवा तसा विकास झालेला नाही असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला . येथील जनता सुज्ञ आहे  माझ्या प्रचार सभेला सर्व गावातून उस्फूर्तपणे लोक पाठिंबा देत आहेत  त्यामुळे माझा विजय निश्चित आहे येत्या वीस तारखेला  अपक्ष छोटेसे भोईर यांच्या बॅटरी या चिन्हासमोर बटन दाबून जनताच मला प्रचंड मताने निवडून देईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

         माझा जो अपक्ष फॉर्म आहे तो यासाठी भरला आहे येथील प्रलंबित प्रश्न आहेत . येथील युवकांच्या अनेक प्रश्न असतील  मग रोजगार, कला , क्रीडा ,सांस्कृतिक हे सर्व प्रश्न एक पाऊल पुढे उभा राहून सोडण्यासाठीच हा माझा अपक्ष फॉर्म भरलेला आहे. नुसते राज्यकर्ते एक मंदिर बांधून देतात पाच वर्षासाठी सर्व मतदार बंधू-भगिनींना बांधून ठेवतात मंदिरे बांधली म्हणजे विकास होत नाही . रस्ते ,पाणी, आरोग्य, शिक्षकांचे व्यवस्था या सर्व गोष्टी असल्या पाहिजे अशी परिस्थिती या भागात दिसत नाही त्यामुळे  मी जनतेशी प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षापासून ऋणानुबंध ठेवलेला आहेत . वेळ अडचणी प्रसंगी नेहमीच सहकार्य केलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य माझ्यासारख्या अपक्ष उमेदवाराला जनता नक्की निवडून देईल असा विश्वास यावेळी छोटम शेठ भोईर यांनी व्यक्त केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *