सुतारवाडीत खासदार सुनिल तटकरेंंना शुभेछा देण्यासाठी तोबा गर्दी
महाराष्ट्रा इतकेच , दिल्ली दरबारी साहेबांचे राजकीय वजन वाढले
रोहा 30 सप्टेंबर (शरद जाधव)
रायगड चे खासदार सुनिल तटकरे यांची देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सुतारवाडी येथे खासदार सुनिल तटकरे याना शुभेछा देण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती.
महायुतीचे महाराष्ट्रातुन अजित पवार गटाकडुन एकमेव खासदार सुनिल तटकरे निवडूण आले आहेत.आणि आज संसदेत वजनदार पद मिळाल्याने गेली अनेक वर्ष महाराष्ट्रा प्रमाणे दिल्लीत साहेबांचे वजन वाढल्याची प्रतिक्रिया उपस्तीतानी दिली.
सुनिल तटकरे हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामूळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे .व रायगड चे खासदार आहेत. महारास्ट्राच्या राजकीय चर्चेत त्यांची मुख्य भुमीका आहे त्यामूळे राजकारणात ते व्यस्त आहेत
महाराष्ट्राचे विधान भवन गाजविल्या नंतर पूढे तटकरेंं च्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागेल असे काहिसे चित्र तयार झाले होते. मात्र राजकीय उमेद अफाट इछाशक्ती जोरावर खासदार सुनिल तटकरे हे दिल्लीचे तख्त आजही गाजवीत आहेत व दोन कर्तबगार मुले पाठीशी असल्याने वयाच्या 70 ला फिट असलेले सुनिल तटकरेंं यांचे मनोबल वाढले आहे . रायगडात तटकरे पूर्वी व अताही किंग मेकर आहेत.
त्याना संसदेत पेट्रोलयम सारखी महत्वाची जबाबदारी सोपवली. हे मोठे पद आहे देशातील 33 खासदार असलेल्या समितीचे तटकरे अध्यक्ष आहेत. पैट्रोल नैसर्गिक वायू,गैस यासारख्या देशाच्या आर्थिक उलाढ़ालीचे स्तोत्र असलेल्या महत्वाच्या कमेटीचे अध्यक्षपद त्याना मिळाले याचा लाभ ते रायगडला मिळऊन देतील असा विश्वास व्यक्त होत आहे
शुभेछा देण्यासाठी जमलेली गर्दी पाहाता व युवा कार्यकर्त्याचा राष्ट्रवादितील राबता पाहाता एकेकाळची गर्दी ने फुललेली कोलाडच्या माडीप्रमाने आता गीता बाग ही राजकारनात दिवसेंदिवस फुलणार असल्याचे चित्र दिसत आहेत