पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
खांब,दि.८(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथील प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या
पाककला स्पर्धेला पालक वर्गाचा
उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.
येथील मुख्याध्यापिका लिना खराडे व सहा.शिक्षिका सौ.सकपाल यांच्या संकल्पनेतून व शालेय विविध उपक्रमांतर्गत व शासकीय
या स्पर्धेमध्ये सर्व माता पालकांनी उत्तमरित्या सहभाग दर्शवून आपापल्या पाककृतींचे उत्तम सादरीकरण केले.तर त्यांनी आळू वडी,मुगडाळ इडली,अप्पे,शिरा,नाचणी सत्त्व लापशी, आळु फतफत , रवा मेदू वडा,रवा लाडू,मेथी लाडू ,मेथी पराठे, बटाटा रोल तिरंगी डोसे बनवून आणलेले पदार्थ अतिशय रुचकर,स्वादिष्ट तसेच पौष्टिक असे होते सर्व माता पालकांचा सहभाग उत्तम असल्यामुळे कार्यक्रमाचे स्वरूप अधिकच उठावदार झाले.या स्पर्धेत प्रथम क्र.दर्शना दिपक मरवडे,द्वितीय क्र‌्.कस्तुरी किसन बामणे तर
तृतीय क्र.सेजल शरद लहाने यांनी पटकावले.
स्पर्धेचे परीक्षण प्राथ.शिक्षिका शाळा चिल्हे येथील सीमा गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *