कोलाड विभागात सण उत्सव काळात आचारसंहितेचे पालन कराः स पो.नि.नितीन मोहिते
कोलाड (कल्पेश पवार) :
लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे.तरी या पुढील येणारे सर्व सण उत्सव काळात आचारसंहिता पालन कराः अशा मार्गदर्शन सूचना कोलाड पोलीस स पो.नि.नितीन मोहिते यांनी शांतता कमिटी मिटिंग प्रसंगीं केल्या.
सार्वत्रिक लोकसभा 2024 निवडणूकांच्या अनुषंगाने कोलाड पोलिसांनी शुक्रवार दि.५ एफील रोजी सकाळी 11:30 ला सपोनि नितीन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली कोलाड पोलीस ठाण्यात शांतता कमिटी सदस्यांची मीटिंग सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी सपोनि नितीन मोहिते,उप चौधरी ,नरेश पाटील, शिंद,आदी पोलीस तसेच परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित कार्यकर्तेना मार्गदर्शन करताना सपोनि नितीन मोहिते यांनी आगामी काळात येणारे सर्व सण
आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य न करण्याच्या सूचना दिल्या व आपली सामाजिक सलोख्याची परंपरा राखत गुण्यागोविंदाने सण साजरे करा तसेच वाढत जाणारे सायबर क्राईम, व मुंबई गोवा महामार्गावर होणारे अपघात व याबाबत गावागावात जनजागृती करा
अशा सुचना दिल्या .
तरी कोलाड विभागात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन कोलाड साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी केले.मीटिंगमध्ये सर्व पक्ष कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून त्यांच्या सूचनांचे निरसन करण्यात आले आहे.