एमडीएन फ्युचर स्कूल मध्ये सातवा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जल्लोषात संपन्न
स्नेहसंमेलनाला”सलाम इस्त्रो”ही थीम सादर
कोलाड-कल्पेश पवार
रोहा तालुक्यातील नामांकित एमडीएन फ्युचर स्कूल येथे सातवा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम शुक्रवार दि.५ जाने रोजी जल्लोषात संपन्न झाला.
ही गेले नऊ वर्ष आपल्या स्कूलमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असून आपला एक विशिष्ट दर्जा रोहा तालुक्यात प्राप्त केला आहे.या स्कूलला लाभलेला निसर्गरम्य भौगोलिक परिसर प्रशस्त प्रांगण याचा पुरेपूर फायदा घेत स्कूलमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.मग त्यात तालुकास्तरीय कबड्डी असो एथलेटिक सामने असो किंवा मग क्रिकेट प्रशिक्षण.एमडीएन चे विद्यार्थी नेहमीच विविध शैक्षणिक स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत असतात तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अशा विविध स्पर्धेत उत्तम कामगिरी दाखवत यशाची वाटचाल पादांक्रात करीत आहे. मग ते राज्यस्तरीय कराटे असो किंवा मग जिल्हास्तरीय त्यात ॲथलेटिक्स असो विद्यार्थी यश मिळवितातच.
ही स्कूल दरवर्षी आपल्या अनोख्या वेगळ्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी ही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कोरोनापूर्वी आपल्या देशासाठी वीरमरण पत्करलेल्या शहीद संतोष महाडिक यांचा संपूर्ण जीवन प्रवास विद्यार्थ्यांनी सादर केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहीद संतोष महाडिक यांची आई व बहीण हे स्वतः सातारा जिल्ह्यातून उपस्थित राहिले होते. कार्यक्रम पाहताना त्यांच्या वयो वृद्ध आईचे अश्रू अनावर झाले होते जणू काही त्यांचा सुपुत्रच समोर उभा आहे असा प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या अभिनय कौशल्यातून जाणवून दिला. त्या मातेचे आशीर्वाद आपल्या विद्यार्थ्यांस लाभले.
संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना त्याचाच एक भाग म्हणून स्कूलमध्ये स्वातंत्र्यासाठी ऐन तारुण्यात देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर चंद्रशेखर आजाद यांचा संपूर्ण जीवनपट साकारला गेला त्यांचे साथीदार भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यासह काकोरी कट जालियनवाला हत्याकांड लाला लजपत राय भारत छोडो आंदोलन हा सर्व स्वतंत्र पूर्व इतिहास प्रसंगानुरुप विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांसमोर पुन्हा जिवंत केला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या रायगड जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय श्रीमती जोस्त्ना पवार शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे केवळ कौतुक केले असेच नाही तर विद्यार्थ्यात असलेल्या शिस्तबद्ध नियोजनाचे भविष्यातील भारतीय नागरिक कसा असेल याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एमडीएम चे विद्यार्थी असे गौरवास्पद विधान केले.
याच यशस्वीतेचे पुढचे पाऊल म्हणून यावर्षीचा पार पडलेला वार्षिक स्नेहसंमेलन
सन 2023 -24
चांद्रयान 3ची यशस्वी मोहीम: भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलेला , भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लावलेला चंद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग केलेल्या इस्त्रोची चांद्रयान तीन ची मोहीम.
विद्यार्थ्यात अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवावे यासाठीच या शैक्षणिक वर्षात “सलाम इस्त्रो”ही थीम वार्षिक स्नेहसंमेलनाला ठरविण्यात आली त्यासाठी स्कूलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्राचार्या शिक्षक वर्ग विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी झपाटून सहभागी झाले व त्यांच्या अथक परिश्रमातून प्रत्यक्षात चांद्रयान तीन ची प्रतिकृती तयार करण्यात आली व संपूर्ण प्रांगणात संपूर्ण सौरमंडल साकारण्यात आले प्रमुख ग्रहांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या तो देखावा म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा होता रात्रीच्या प्रकाशात जणू काही संपूर्ण अंतराळ आपल्यासमोर उभा आहे असं पाहणाऱ्याला भासत होते चांद्रयान तीन चंद्रावर कशा पद्धतीने लँड झाले त्याची जशीच्या तशी प्रतिकृती अशी साकारण्यात आली की कोणालाही त्याच्यासोबत छायाचित्र घेण्याचा मोह व्हावा छोटे बच्चे कंपनी तर त्याला हात लावून पहात होते उपस्थिताना आपण जणू काही अवकाशात फिरत आहोत असे वाटत होते बच्चे कंपनी पालक रॉकेटमध्ये फोटो घेत होते.
यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी “माननीय अनंत पत्की”( इस्त्रोचे माजी डेप्युटी डायरेक्टर ) व त्यांच्या सहचरणी वसुधा पत्की. ज्यांनी इस्रो
या भारताच्या वैज्ञानिक संस्थेत वैज्ञानिक म्हणून कार्य केले अशा महान वैज्ञानिकांची उपस्थिती म्हणजेच कार्यक्रमाला चार चांद लागावे अशीच. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वात प्रथम डोरा व तिचे चिंटू पिंटू हे सवंगडी यांच्यामार्फत चिमुकल्या IK 1ते ग्रेड 2 च्या विद्यार्थ्यांनी अंतराळाची माहिती करून दिली हा सर्व पार्ट वन चा भाग होता. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेल्या पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप जी तटकरे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात असे घोषित केले की यावर्षीपासून आपल्या संस्थेच्या GDT Future School सायन्स फॅकल्टी मध्ये (इयत्ता अकरावी बारावी) आयटी सुरू करण्यात आले आहे. तसेच आपल्या संस्थेच्या श्री नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालय- गोवे येथे BSC IT सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे सुरू झाले तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फायदा होईल.
प्राचार्य श्रीमती योगिनी देशमुख यांनी वर्षभरात स्कूलमध्ये कोणकोणत्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले विद्यार्थ्यांनी आंतर शालेय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले याचा अहवाल सादर करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यात मागील शैक्षणिक वर्षात 90 % जास्त गुण संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन तर केलेच परंतु ही सर्व पूर्वतयारी पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे सहृदयतेणे कौतुक केले. कारण यावर्षीची वार्षिक स्नेहसंमेलनाची थीमच भारताने इस्त्रोची स्थापना करण्यापासून स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू प्रमुख वैज्ञानिक विक्रम साराभाई पुढे अटल बिहारी वाजपेयी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी केलेले कठोर परिश्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिलेली इस्त्रो ही भारतीय वैज्ञानिक संस्था तेथील शास्त्रज्ञानी केलेले परिश्रम व त्या परिश्रमाचे फळ म्हणून इस्त्रोने केलेले चांद्रयान तीन चे यशस्वी रित्या लँडिंग परंतु त्या अगोदर चांद्रयान दोनच्या उड्डाणात मिळालेले अपयश तरीही न हरता न करता जिद्दीने केलेले चांद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सर्वात प्रथम भारताने केलेले यशस्वीरित्या लँडिंग हा सर्व भाग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने अतिशय नियोजित वेळेत चिकाटी वृत्तीने प्रेक्षकांसमोर सादर केले मग ते IK 1चे विद्यार्थी असू दे किंवा इयत्ता बारावीचे विद्यार्थी असोत. सर्वांनीच नाटिकाद्वारे व नृत्यविष्कारानी सादर करून उपस्थितांची मने जिंकली
हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय संदीप जी तटकरे साहेब तसेच सेक्रेटरी श्रीयुत प्रकाश सर्कले सर, रजिस्टर श्री अजित तेलंगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री देवेंद्र चांदगावकर प्राचार्या योगिनी देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक शिक्षक वृंद शिक्षकेतर वर्ग विद्यार्थी यांनी अथक परिश्रम करून यावर्षीचा स्नेहसंमेलन यशस्वीरित्या सादर केला .