दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व सत्कार समारंभ..

दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व सत्कार समारंभ..
खांब दि.३०(नंदकुमार मरवडे)
रोहे तालुक्यातील कोलाड येथील अल्पावधीत नावारूपाला आलेल्या शरंण्या अँकॅडमी मधील १० च्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ प्रसंगी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बुधवार दि.२९ जानेवारी रोजी बोर्ड परीक्षा विषयी मौलिक मार्गदर्शन आणि शुभेच्छा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
शरंण्या अॅकॅडमीच्या संचालिका ऋतूजा महागावकर,संचालक तेजस महागावकर यांच्या अथक परिश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कोलाड नाक्यावर अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि विद्यार्थ्यी वर्गाच्या पसंतीस उतरलेल्या शरंण्या अॅकॅडमीच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४/२५ च्या दहावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे शुभेच्छा सन्मान सोहोळया प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आदर्श शिक्षक तथा पत्रकार नंदकुमार मरवडे ,केशव म्हस्के,कल्पेश पवार,तुषार जंगम,विलास निकम,लाला शिंदे,कोलाड सरपंच रविंद्र सागवेकर,यशवंत निकम, शकुंतला निकम आदी मान्यवरांसह शरंण्या अॅकॅडमीच्या प्रमुख संचालिका ऋतूजा महागावकर, तेजस महागावकर आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *