रोह्यात उमेदवार रवीशेठ पाटील यांची प्रचार सभा, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महायुतीतील सर्व पक्ष भक्कमपणे रवी शेठ पाटील यांच्या पाठीशी तर विजय निश्चित : खासदार धैर्यशील पाटील
धाटाव: प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील सोनगाव येथे १९१ पेण ,पाली , रोहा मतदार संघाचे अधिकृत महायुतीचे उमेदवार रवी शेठ पाटील यांनी बुधवार दि. ( १३ ) रोजी सभा पार पडली. या सभेला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती लाभली .
यावेळी खासदार धैर्यशील पाटील त्यांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या विभागात खासदार सुनिल तटकरे , आमदार रवीशेठ पाटील , मंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे व व माझ्या माध्यमातून या विभागात कोट्यावधी रुपयांची विकासकामे करण्यात आलेली आहेत . केंद्रात आपली सत्ता आहेच परंतु राज्यात गेल्या अडीच वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गरीब कल्याणकारी अनेक योजना आणलेला आहेत. आता थेट फायदा माझ्या कष्टकरी शेतकरी, महिलांना होतं आहे. विशेष करून लाडकी बहीण योजना राज्य सरकारने उत्तमरीत्या राबवल्यामुळे महिलांच्या हातात चार पैसे आले . महिला उद्योग धंदे करू लागल्या , त्यांच्या प्रगतीत वाढ व्हायला लागली त्यामुळे खऱ्या अर्थाने महिलाचा सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे . विशेष करून गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या प्रतिस्पर्धी म्हणून कधी रवीशेठ पाटील विरुद्ध धैर्यशील पाटील तर कधी राष्ट्रवादी विरुद्ध रवी शेठ पाटील हे लढत आलो . परंतु या विभागात राष्ट्रवादीच्या खासदार सुनिल तटकरे यांचे ताकद , आमदार रवीशेठ पाटील यांची ताकद व धैर्यशील पाटील या तिघांची असलेली शक्ती आता एकत्रित आलेली आहे . त्यामुळे रवीशेठ पाटील यांच्या विजयाची खात्री आहे येथील जनताच सरकारने केलेले कामे टिकून ठेवण्यासाठी येत्या 20 तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून देतील असा विश्वास खासदार धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला . या राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पहायला मिळत आहे . परंतु या रायगड मधील पेण मतदार संघात परिस्थिती वेगळी आहे . कोण म्हणतंय मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे त्यामुळे आघाडीतच बिघाडे झालेली आहे . या दोन्ही उमेदवारांना कोणत्याही निवडणुक लढवायचा अनुभव नाही . फक्त फोन वरून मतदारांना विचारायचं तुमच्या काही समस्या आहेत का , असल्यास तुम्ही सांगा अशी चेष्टा प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारांची करीत आहेत जनता सुज्ञ आहे अडचणीच्या काळात आपल्याला हक्काचा माणूस कोण मदत करु शकतो याचा जनताच विचार करून विरोधकांना धडा शिकवेल असा घनाघात खा. धैर्यशील पाटील यांनी विरोधकांवर केला .
या विभागात तटकरे कुटुंबियांची गेल्या चाळीस वर्षांपासून जनतेशी ऋणानुबंध आहेत . येथे नेहमीच राष्ट्रवादी विरुद्ध शेकापसा संघर्ष असायचा परंतु येथील जनता तटकरे यांच्या पाठीशी राहिलेले आहे . त्यामुळे या विभागात रस्ते , पाणी , लाईट अशी कोट्यावधी रुपयांची अनेक विकास कामे खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून झालेली आहेत. खासदार सुनील तटकरे निवडणुकीत या नऊ ग्रामपंचायतीने या विभागाने जवळपास 2200 मतांची लीड दिली . त्यामुळे पुन्हा एकदा सर्व ताकतीने राष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्ता ज्या पद्धतीने खासदारकीच्या निवडणुकीत ताकतीने काम करत होता त्याच पद्धतीने देखील रवीशेठ पाटील यांच्या निवडणुकीत करतील . सर्व महायुतीचे पदाधिकारी एकत्रित प्रचार करीत आहेत त्यामुळे निश्चितच विरोधकांना मत काढण्याचे संधी मिळणार नाही त्यामुळे आपोआप त्यांच्या डिपॉझिट जप्त होईल असे माजी आमदार अनिकेत तटकरे म्हणाले .
या पेण मतदारसंघातील विभागातील १९९५ साला पासून सर्व गावांशी माझे संबंध आहे . इथे विकास निश्चित झालेला आहे . या सरकारच्या माध्यमातून लाडकी योजना आणल्यामुळे याचा उपयोग संसारात चांगल्या पद्धतीने होतोय . केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सन्मान केला जातोय वर्षाला सहा हजार केंद्र सरकार व सहा हजार राज्य सरकार देत आहे . तसेच सर्व घटकांना योग्य तो न्याय देण्याचा काम या सरकारने केलेला . बाजारात रोजचा रोज कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असल्यामुळे अर्थव्यवस्था चांगल्या मार्गाने आपली प्रगती पथावर आहे . त्यामुळे येथील संपूर्ण मतदारा़चा मला पाठिंबा असल्यामुळे माझा निश्चित न भूतो न भविष्य असा विजय होईल असा विश्वास त्यावेळी रवीशेठ पाटील यांनी व्यक्त केला .
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते अनंता देशमुख, जेष्ठ नेते आप्पा देशमुख , संदीप चोरगे , राजु पोकळे, सोपान मोहिते, युवा मोर्चा सरचिटणीस रोशन चाफेकर, भाजपा महिला चिटणीस श्रद्धा घाग, रोहा शहर अध्यक्ष भाजपा यज्ञेश भांड, शिवसेना सदस्या वैभवी भगत , नवनीत डोलकर, भाजपा नेत्या भांड ताई , धनश्याम कराळे तंटामुक्त अध्यक्ष उडदवणे , सरपंच मारुती तुपकर, उपसरपंच निलेश मालुसरे, माजी सरपंच हेमंत मालुसरे, उपसरपंच योगेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्या कविता शेलके, संतोष गायकर, रविंद्र मोहिते, निलेश जंगम , हेमंत कडव, भाजपाचे सुमित जंगम, सुदेश साळुंखे, शुभम मोहिते, अनिल खंडागळे तसेच शिंदे शिवसेना माजी सरपंच शंकर काते यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.