चर्चेतील मतदारसंघ !! शेकापच्या
चित्रलेखा पाटील यांच्या घराण्याचा व विद्यामान आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
अलिबाग मुरुड मतदार संघात काटे की टक्कर , उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी घेतली प्रचाराचा आघाडी
या वर्षी शिट्टी वाजणार नाका नाक्यावर तुफान चर्चा
धाटाव: प्रतिनिधी (जितेंद्र जाधव)
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग मुरुड मतदार संघात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी सध्याच्या परिस्थितीनुसार काटे कि टक्कर पहायला मिळत आहे. घडणाऱ्या घडामोडीनुसार येणारा कालच भवितव्य ठरवणार आहे . गेल्या 40 वर्षाच्या कालखंडात अलिबाग मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा कायम धबधबा राहिलेला आहे परंतु गेल्या पाच वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करून महेंद्र दळवी हे निवडून आले होते . परंतु आत्ताची परिस्थिती राजकीय वेगळी आहे . त्या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा नुपाल पाटील विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी विरुद्ध अपक्ष छोटम भोईर हे तिरंगी लढत होणार आहे . परंतु खरी लढत ही चिऊताई विरुद्ध दळवी थेट सामना पाहायला मिळणार आहे . त्यामुळे पाटील घराण्याच्या अस्तित्वाची व प्रतिष्ठित लढाई मानली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान २०१९ च्या निवडणूकीत महेंद्र दळवी यांना 111047 मते मिळवली तर शेकापचे विद्यमान आमदार सुभाष (पंडित) पाटील यांना 78086 मते मिळाली असून त्यांचा 32611 मताने पराभव केला. काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र ठाकूर यांना 11853 तर काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांना फक्त 2511 मते मिळाली. मात्र संध्याची परिस्थिती पुर्णता वेगळी आहे, त्यामुळे झालेल्या आघाडीत बिघाड झाल्याने कोण जिंकले,कोण हे अद्याप सांगता येणार नाही परंतु नव्या उमेदीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील सुशिक्षित उमेदवार आहेत . चांगलं नविन विकासाचे व्हिजन घेऊन पुर्ण ताकदीने उतरल्या असुन घेतलेल्या प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः महागाई वरुन ञस्त महिला हिरहिरीने ताईच्या पुढे प्रचारात सरसावल्या आहेत . त्यात पाटिल घराण्याचा वारसा लाभलेला असल्याने राजकीय बुजुर्ग मंडळी मतांसाठी आकडेवारी हि शेकाच्या बाजुला झुकता माप मिळेल . त्यात काँगेस व ठाकरेंच्या शिवसेनेचे बळ मिळाले आहे.
मतांचे विभाजन नक्की कसे होणार अपक्ष उमेदवार दिलीप भोईर निशाण ( बॅटरी ) यांची रणनीती काय असेल हे देखील पहाने तेवढेच महत्त्वाचे आहे. एकंदरीत चित्रलेखा पाटील निशाण ( शिट्टी ) यांच्या सोबत शेकाप , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस तसेच महाविकास आघाडीची मोठी ताकद मिळाणार आहे. तसेच सांध्यांचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी निशाण ( धनुष्यबाण) यांच्या सोबत शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, तसेच भाजप व आरपीय यांचे बळ मिळणार आहे तसेच अपक्ष उमेदवार छोटम शेठ भोईर यांची देखिल अनेक वर्षापासून ऋणानुबंध असलेली जनता . त्यामुळे तिरंगी लढतीत नक्की कोण विजय मिळवतो हे येत्या २० तारखेला मतपेटीतून चित्र स्पष्ट होणार आहे.