रोहा तालुका चर्मकार समाजाच्या अध्यक्षपदी रुपेश नांदगांवकर तर सरचिटणीसपदी राजन बिरवाडकर यांची निवड
रोहा – कल्पेश पवार ;- रोहा तालुका चर्मकार समाज संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी रुपेश नांदगांवकर तर सरचिटणीसपदी राजन बिरवाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रायगड जिल्हा चर्मकार संघटनेचे उपाध्यक्ष दिपक आंबडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा सहचिटणीस दिलिप पाबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या समाजाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
रोहा तालुका चर्मकार समाज संघटनेच्या विद्यमान कमिटीची मुदत संपल्याने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष संजय पालकर, उपाध्यक्ष जगदीश नागोठकर, सरचिटणीस राजन बिरवाडकर, सहचिटणीस दर्शन कदम, खजिनदार गौरव पाबरेकर, संघटक अनंत जांभळे सहसंघटक अंकुश जानवळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्येष्ठ मार्गदर्शक कृष्णा महाडीक, पांडुरंग चिपळूणकर, रमेश पाबरेकर, प्रशांत म्हशीलकर, समीर नागोठकर, दिलीप भोईरकर यांची सल्लागार मंडळात निवड करण्यात आली. रायगड जिल्हा समाज संघटनेच्या कार्यकारणीत रोहा तालुक्यातुन प्रतिनिधी म्हणून विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष दिपक नारायण आंबडकर आणि जिल्हा सहचिटणीस दिलीप उमाजी पाबरेकर यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष समीर चंद्रकांत नागोठकर यांनी नवनिर्वाचीत अध्यक्ष रुपेश धर्मा नांदगावकर यांचेकडे सूत्रे सुपूर्द केली. बैठकीत नियमित कामकाज, जमा खर्चाचे वाचन, आयत्या वेळीच्या विषयांवर विचारविनिमय झाले. यावेळी समाजाचे ज्येष्ठ कृष्णा महाडिक, नरेश चांदोरकर, संदीप पालकर, रवींद्र पेणकर, नरेश नांदगावकर, विजय नागोटकर आदी उपस्थित होते.