इ लर्निंग शैक्षणिक साहित्य लॅबचे शानदार उद्घाटन

इ लर्निंग शैक्षणिक साहित्य लॅबचे शानदार उद्घाटन
खांब,दि.७(नंदकुमार मरवडे)
इ लर्निंग शैक्षणिक साहित्य लॅबचे उद्घाटनाचा शानदार कार्यक्रम विठ्ठलवाडी येथे संपन्न करण्यात आला.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक विकास निधीतून ई लर्निंग शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच रायगड जिल्ह्यातील विविध शाळांना वितरित करण्यात आले.तर तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी -राजखलाटी या विद्यालयास प्राप्त झालेल्या या शैक्षणिक साहित्य लॅबचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष रवींद्र तारू,येथील मा.सरपंच छाया तारू, काशिनाथ शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक अर्चना मरवडे,सहा.शिक्षिका शिल्पा मरवडे, गौतम जाधव,शुभदा भालेकर, ऋषिकेश महाडिक, यांच्या सुजित लोखंडे,नितेश पोटफोडे आदी उपस्थित होते.या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष रवींद्र तारू,येथील मा.सरपंच छाया तारू, काशिनाथ शेडगे यांचा यथोचित सन्मान करून विद्यालयाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *