गुरे मालकांने सावधान !  उनाड गुरे दिसल्यास सर्व गुरे गो शाळेत पाठवणार- स पो.नि.नितीन मोहिते

गुरे मालकांने सावधान ! कोलाड विभागात उनाड गुरे दिसल्यास सर्व गुरे गो शाळेत पाठवणार
– स पो.नि.नितीन मोहिते
कोलाड (कल्पेश पवार)
                       कोलाड विभागांत उनाड गुरांचा प्रशन ऐरणीवर आला असून ज्या मालकांची ही उनाड गुरे आहेत त्यानी येत्या दहा दिवसांत ही गुरे घेऊन न गेल्यास
या पुढे तात्काळ कारवाई होणार असल्याची सूचना कोलाड पोलीस अधिकारी नितीन मोहिते यांनी आयोजित मिटिंग प्रसंगीं केल्या.
               गेल्या कित्येक दिवसापासून कोलाड,खांब, सुतार वाडी परिसरात रस्त्यावर उनाड गुरे फ़िरत आहेत. या गुरांचा बंदोबस्तात करावा अशी मागणी निसर्ग प्रेमी यांनी कोलाड पोलिसांना केली होती.या मागणीची तात्काळ दखल घेत
                  कोलाड पोलिसांनी गुरुवारी दि.३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सपोनि नितीन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली कोलाड पोलीस ठाण्यात शांतता कमिटी
सदस्यांची तसेच या विभागातील सर्व सरपंच,उपसरपंच यांची मीटिंग सभा आयोजित करण्यात आली होती.
                   यावेळी सपोनि नितीन मोहिते,नरेश पाटील,शिंद,आदी पोलीस तसेच परिसरातील सर्व आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे,सभे सरपंच समीर महाबळे,तळवली सरपंच रवी मरवडे,सुरेश वाघमारे उठबा सेनेचे चंद्रकांत लोखंडे,प्रफुल्ल बेटकर,वाचकवडे जेष्ठ नागरिक बामुगडे ,जंगम आदी सर्व पत्रकार उपस्थित होते.       
                उपस्थित सरपंच,निसर्ग,प्रेमी यांना
मार्गदर्शन करताना सपोनि नितीन मोहिते म्हणाले की प्रत्येक सरपंचांनी आपल्या गावात ग्रामसभा घेहुन गावात दवंडी पिटवावी की गुरे मालकांनी आपली गुरे इकडे तिकडे न फिरवता गुरे चरून झाल्यावर घरच्या घरी बांधावी जेणे करून ही गुरे उनाड होणार नाहीत त्यानी अपघात होणार नाहीत.तरी येत्या 10
दिवसांत प्रत्येक गावा गावात ग्रामपंचायतीने जनजागृती करून आपली गुरे मालकांना ही गुरे आपल्या ताब्यात घ्यावी जर 10 दिवसांच्या नंतर ही उनाड गुरे रस्त्यावर दिसल्यास ही उनाड गुरे तात्काळ गो शाळेत जमा करण्यात येतील व गुरे मालकांचा कडून त्यांचा खर्च वसूल करण्यात येईल.
                 तरी कोलाड विभागात शांतता व सुव्यवस्था  राखण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन कोलाड साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी केले.मीटिंगमध्ये सर्वांचा सूचना ऐकून त्यांच्या सूचनांचे निरसन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *