रोहे शहराच्या विकासाचा खासदार सुनिल तटकरें कडुन आढावा

रोहे शहराच्या विकासाचा खासदार सुनिल तटकरें कडुन आढावा
शहरात मुख्य रस्त्यावर डीवायडर बसविणार
रोहा 26 सप्टेंबर (शरद जाधव)
                        रोहा नगरपालिका हद्दित राष्ट्रवादीपक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. याचा आढावा तसेच मुख्य रस्त्याला ड़ीवायडर बसविणे या प्रस्नाकरिता मुख्य बैठक खासदार सुनिल तटकरें च्या उपस्तीतीत जेष्ट नागरीक सभागृह येथे संपन्न झाली
       यावेळी मा.आमदार अनिकेत तटकरे. तालुकाध्यक्ष विनोद पासिलकर. नदुशेट म्हात्रे सुभाष राजे. नगरसेवक समीर सकपाळ. मयुर दिवेकर. महेंद्र गुजर. महेश कोल्हटकर. राजू जैन अहमद दर्जी. अमित उकडे. चंद्रकांत पार्टे.रोहेकेर नागरीक.संबधित खात्याचे अधिकारी. राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्तित होते.
                    रोहे शहरातील मुख्य रस्त्यावर ड़ीवायडर बसविण्याचा प्रस्न प्रलंबित होता तो प्रस्न रोहेकेर नागरिक व व्यापारी वर्गाच्या उपस्तीथीत चर्चेतुन सोडविन्यात आला. तसेच कुंडलिका जुन्या पुलाचा प्रस्न. नविन पूल . अष्टमी कडुन देशमुख पंपाजवळ खराब झालेला रस्ता त्यामूळे होनारे अपघात. या संदसंदर्भात उपाययोजना याविषयी चर्चा झाली . तर रोह्यात मुंबईच्या धर्तीवर दर्जेदार नाट्यग्रह तयार होत आहे. मारुती मंदीर. शहरातील रस्ते. वीज वाहतुक कोंडी उपाययोजना याविषयावर चर्चा झाली.
            नदी संवर्धन मुळे रोहे शहाराच्या र्सौदर्यात भर पडली. त्याप्रमाने रोहा रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण होत आहे. त्याचे प्रेझेंटेशन दाखवण्यात आले. अद्यवात असे स्थानक उभे राहाणार आहे. याकरिता केंद्र शासनाचा निधी नाही तर मंत्री अदिती तटकरे यांच्या कल्पकतेतुन हा निधी मिळाला आहे असे सुनिल तटकरे म्हणाले
     तर नदीसंवर्धन परिसरात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहात आहे.त्याचे आनावरण नवरात्रोत्सव काळात होत आहे. शिवरायांचे वंशज उपस्तीत राहाणार आहेत. रोहे शहरात प्रथमच  छत्रपतींचा भव्य पुतळा उभा राहत आहे. त्यामूळे शिवकाळीन प्रमाणे  कार्यक्रम हा हटके होनार असल्याची महीती अनिकेत तटकरे यानी दिली.
      येणारा काळ नवरात्र उत्सवाचा असल्याने रस्ते. वीज ईतर सुविधा कशा मिळतील याकडे जतिने लक्ष ठेवा आशा सुचना खासदार तटकरे यानी अधिकारी वर्गांना दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *