रानभाज्या प्रदर्शनास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

रानभाज्या प्रदर्शनास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद
खांब,दि.११(नंदकुमार मरवडे)
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ अधिनस्त कृषि विज्ञान केंद्र रोहा मार्फत आणि कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी संजीवनी व निसर्गमित्र रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील खांब गावात ९ आँगस्ट या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन
ग्रा.पं.कार्यालयात प्रा. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहाय्यानेया प्रदर्शनास येथील रहिवासी वर्गाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.
केंद्र प्रमुख डाँ. मनोज तलाठी व प्रा. जीवन आरेकर यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आलेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कृषि विज्ञान केंद्राचे प्रा. जीवन आरेकर, डॉ. राजेश मांजरेकर, प्रा.सुधाकर पाध्ये, डॉ.प्रमोद मांडवकर, उपसरपंच दत्ता वातेरे, माजी सरपंच रामचंद्र चितळकर,प्रकाश थिटे, ग्रामपंचायत सदस्या रंजना टवळे, पो.पाटील मनोज सावरकर, आणि कृषी सेवक मोनिका फडके व श्री. गाडे उपस्थित होते.प्रदर्शनादरम्यान विविध प्रकारच्या एकूण २० रानभाज्यांची ओळख करून देण्यात आली, तसेच त्यांचे औषधी गुणधर्म भित्तीपत्रकाद्वारे सविस्तरपणे उलगडण्यात आले. तर शास्त्रज्ञांनी शेतक-यांना रानभाजी व शेती विषयक विषयांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खांब मधील शिक्षक व विद्यार्थी, तसेच स्थानिक ५० शेतकऱ्यांनी आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *