चंद्रकला खांडेकर यांना देवाज्ञा

चंद्रकला खांडेकर यांना देवाज्ञा
खांब,दि.११(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील सोनगाव येथील रहिवासी असणाऱ्या चंद्रकला चंद्रकांत खांडेकर यांना ,४ आॅगस्ट रोजी अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली.त्या समयी त्या ६८ वर्षांच्या होत्या.
अत्यंत धार्मिक वृत्तीच्या व सर्वांशी प्रेमाने वागून आपल्या गावात व समाजातील विविध प्रकारच्या कार्यक्रमात नेहमीच सक्रिय सहभागी होऊन योगदान देणाऱ्या चंद्रकला खांडेकर यांच्या निधनाबद्दल समाजातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह त्यांचे आप्तस्वकीय मित्रपरिवार सगेसोयरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी मंगळ.दि.१३ आॅगस्ट तर अंतिम धार्मिकविधी १५ आॅगस्ट रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *