रोह्यात भाजपा बुथ कार्यकर्ता बैठक संपन्न
तर बैठकीत तटकरे उमेदवार असले तरीही ते पंतप्रधान मोदी यांनाच पाठिंबा देणार यातच समाधान
रायगडाचा खासदार हा महायुतीचा कामे करणार : मंत्री अदिती तटकरे
कोलाड : कल्पेश पवार
३२- रायगड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीचे बुथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स आणि निवडणूक नियोजन बैठक शुक्रवारी दि. (५ ) रोजी रोहा शहरातील टाऊन हॉल घ्या समोर असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. तर या बैठकीत रोहा तालुक्यातील भाजपाची ताकद खासदार सुनिल तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे कारण सुनिल तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरीही ते महायुतीचे उमेदवार आहेत व निवडून आल्यानंतर तिसऱ्यादा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा बसविण्यासाठी पाठिंबा देणार यातच समाधान आहे असा उपस्थित भाजपाचे सर्व नेते , पदाधिकारी, कार्यकर्ते विश्वास व्यक्त केला.
या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे धैर्यशील पाटील यांचे नाव उमेदवारी साठी दिल्ली पर्यंत गेले होते . परंतु वरिष्ठांच्या आदेशानुसार महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असला तरीही तो उमेदवार आपलाच समजून नरेंद्र मोदीजीचे या़चे हात बळकट करण्यासाठी सुनिल तटकरे यांना प्रचंड मताने निवडून आणले पाहिजे असे आव्हाहन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आमदार रविशेट पाटील यांनी नियोजित बैठकीत केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले पहायचे आहे. देशात ४०० पार व राज्यत ४५ प्लस चार नारा देण्यात आला आहे. गेल्या एक दिड वर्षात महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्यात वेगवान विकास झालेला आपल्याला पहायला मिळतं आहे . त्यामुळे या रायगडच्या भुमीतुन लोकसभेवर महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना निवडून आणण्यासाठी भाजपा , राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अन्य पक्ष मिळुन एकदिलाने काम केले पाहिजे. जेव्हा या महायुतीचा रायगडचा खासदार निवडून येईल तेव्हा सर्व कामे महायुतीची होणार असल्याचे महिला व बालकल्याण मंञी अदिती तटकरे यांनी सांगितले.
या रायगड जिल्ह्यातुन अनंत गीते हे सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते . २०१४ ते २०१९ या कालावधीत केंद्रिय अवजड उद्योग मंत्री होते परंतु या संधीचे सोने करु शकले नाहीत परंतु लोकांना विकास कामे हवी असतात. मग कोविड , निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते वादळ , महाड व चिपळूण येथे महापुर आला अशा संकट काळात मतदारांना वाऱ्यावर सोडणारा खासदारकीचा उमेदवार नसावा त्यामुळे या रायगड जिल्ह्यातील जनता अनंत गीते यांना पाठबळ देणार नाही असा विश्वास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
जेव्हा एखाद्या गावावर संकट येते त्यावेळेस संपूर्ण गाव आपले भांडण विसरून गावासाठी काम करतो तशाच पद्धतीने या देशासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवाराचे सर्व मतभेद विसरून एक दिलाने भाजप कार्यकर्ते या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या एक पाऊल पुढे राहून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून आणू असे भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी सांगितले.
या वेळी मंत्री अदिती तटकरे, आ. रविशेट पाटील, सहकारी क्षेत्र प्रदेश उपाध्यक्ष गिरीश तुळपुळे, विधानसभा प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे, एडवोकेट महेश मोहिते,राजेश मापारा, वैकुंठ पाटील, जिल्हा अध्यक्षा हेमा ताई मानकर, गिताताई पार्लेच्या , सोपान जांभेकर, निमिश वाघमारे, राजन डुंबे, पि. व्हि. सनल कुमार, मंजु कुंद्री मोदी , जयश्री भांड, श्रेया कुंटे, वैशाली मापार, छाया तारु, श्रद्धा घाग, अपर्णा सुटे , ओक ताई, यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शेकापला खिंडार , उपसरपंच व कार्यकर्ते यांचा भाजपा मध्ये जाहिर प्रवेश तळाघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मोनिका मोरे , सयांजी कांबळे, मिलिंद कांबळे, मच्छिंद्र मोरे , मोनिका मोरे, हर्षदा मोरे, दिनेश ठाकूर, मोनाली कांबळे, दिव्या ठाकूर यांनी आमदार रविशेट पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला व या त्यांनी सर्वांचे सहर्ष स्वागत केले.