मुंबई – गोवा महामार्गासाठी आता आरपारची लढाई*..
*कोकणातील पुढारयांना 10,000*
*SMS पाठवून जाब विचारणार*
मुंबई – गोवा महामार्गाची झालेली दूरवस्था आणि 13 वर्षांपासून रखडलेले महामार्गाचे काम याचा निषेध कोकणातील पत्रकार आणि जनता अनोख्या पद्धतीने करत आहेत ..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत रायगडचे खासदार सुनील तटकरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना एकाच दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट 23 रोजी तब्बल 10,000 एस.एम एस पाठवून महामार्गाला होत असलेल्या विलंबाचा जाब विचारतील..
आज नागोठणे येथे झालेल्या रायगड प्रेस क्लबच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला..
कोकणातील पत्रकारांसह स्थानिक जनता आणि मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था पाहून ज्यांना ज्यांना संताप येतो अशा सर्वांनी या “एस.एम एस आंदोलनात सहभागी व्हावे” असे आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी केले आहे..
याच दिवशी पत्रकार बोंबाबोंब आंदोलन करून आपला निषेध नोंदवतील.. या आंदोलनात एस.एम.देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आदि सहभागी होत आहेत..