आदर्श शिक्षक समितीच्या नाशिक राज्यभेत
राज्य नेतेपदी रामदास सांगळे तर राज्य अध्यक्षपदी साखरे यांची निवड!!
कोकण विभागाच्या अध्यक्ष पदी प्रसाद म्हात्रे व राज्य संघटक पदी शरद पाटील यांची निवड
रोहा (कल्पेश पवार)- महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा राज्याचे अध्यक्ष रामदास सांगळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली तर संस्थापक दिलीप ढाकणे, शिक्षक नेते अंकुश काळे, राज्य सरचिटणीस अंजुम पठाण, राज्य नेते के सी गाडेकर, अनिल मुकलकवार ,उत्तम पवार,माध्यमिक विभागाचे नितीन कोळी, महिला आघाडी राज्य प्रमुख मुक्ता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सिन्नर येथे सकाळी 10 ते 4 या वेळेत पार पडली, सभेला राज्यातील रायगड, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, बीड, जालना, नगर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद ,नाशिक जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांची उपस्थिती होती, या सभेत राज्याचे विद्यमान अध्यक्ष यांनी पद त्याग करून प्रस्थापित संघटनेने केलेल्या अन्यायग्रस्त लातूर चे सुपुत्र शिवाजीराव साखरे पाटील यांना राज्याचे अध्यक्षपदी निवड केली आहे, तर उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी राज्य नेतेपदी रामदास सांगळे यांची निवड केली आहे, दिवसभर झालेल्या सभेत शिक्षक नेते अंकुश काळे ,संस्थापक दिलीप ढाकणे, शिवाजीराव साखरे, अजय कापसे यांनी उपस्थितीत पदाधिकाऱ्याना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, राज्यातील शिक्षकांचे विविध प्रकारच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली, यामध्ये प्रामुख्याने बदली धोरण , राज्यातील शिक्षकांचे रिक्त पदे, नवीन भरती, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी ,विषय शिक्षक पदोन्नतीच्या जागा भरणे, वेतन त्रुटी, वस्ती शाळा शिक्षक ,माध्यमिक शाळा व शिक्षक, कला क्रीडा शिक्षक ,अवाजवी टपाल कामे, बी एल ओ कामे,आशा सर्व प्रकारच्या विषयांवर चर्चा करून शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, तसेच राज्य कार्यकारिणीमध्ये विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते यांना पदावर नियुक्त्या देण्यात आल्या, यामध्ये कोकण विभागाचे अध्यक्ष म्हणून प्रसाद म्हात्रे, पनवेल यांची निवड करण्यात आली तर राज्य संघटक म्हणून .शरद पाटील रोहा यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी रायगड जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष अजय कापसे, शिक्षक नेते प्रसाद म्हात्रे, जिल्हा कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, जिल्हा समन्वयक संतोष यादव, रोहा तालुकाध्यक्ष नारायण गायकर, पनवेल तालुका अध्यक्ष आनंद पाटील, विलास सुटे,शशिकांत शेळके, विजय धोत्रे,शरद पाटील,अविनाश पाटील, संतोष शेवाळे, गजानन मालकर, मधुकर तांबोळी, कृष्णा खंदारे व पद्माकर पाटील यांची उपस्थिती होती.
वरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी कडून अभिनंदन करण्यात आले.